सोलापूर – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील कामती (खुर्द) आणि माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी ग्रामपंचायतींची विभागीय स्तरावर सखोल तपासणी करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तालयाच्या अपर आयुक्त (विकास) श्रीमती दिपाली देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये भेटी देत राबवलेल्या उपक्रमांची पाहणी केली.

तपासणी दरम्यान शाळा, अंगणवाडी, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह, परसबागा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मासिक पाळी स्वच्छता उपक्रम यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले.
ग्रामपंचायत अधिकारी मंजुष्री कारंडे यांनी सादरीकरणाद्वारे गावातील विविध उपक्रमांची माहिती मांडली.
विशेष उपस्थिती:
अपर आयुक्त देशपांडे यांच्यासह सहायक आयुक्त रविंद्र कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, पंचायत समिती व ग्रामविकास विभागातील अधिकारी, सरपंच व उपसरपंच, शाळा शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला आरोग्यासाठी विशेष..
अपर आयुक्त श्रीमती देशपांडे यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशीन बसविणे, स्वच्छ पाणी व स्वच्छता यासाठी अधिक प्रयत्न करणे, तसेच ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाचे कौतुक करत, पुढील टप्प्यांत अधिक सजग राहण्याचे निर्देश दिले.
युवकांसाठी प्रेरणा:गावातील युवकांना स्पर्धा परीक्षा वाचनालय उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सुचना केल्या.