Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शरणु हांडे अपहरण प्रकरणी मोठी अपडेट

MH13 News by MH13 News
2 months ago
in गुन्हेगारी जगात
0
Breaking | एमआयडीसी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या ४ तासांत अपहरण पीडिताची सुटका, चार आरोपी अटकेत..
0
SHARES
230
VIEWS
ShareShareShare

शरणु हांडे अपहरण प्रकरणी मोठी अपडेट

MIDC पोलीस ठाणे, सोलापूर यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी राकेश भीमाशंकर कुदरे
वय: 21 वर्षे
रा. मुमताज नगर, सोलापूर,श्रीकांत बाबुराव सुरपुरे
वय: 24 वर्षे
रा. सिदरामेश्वर नगर, MIDC सोलापूर

वरील दोन्ही आरोपींना मु. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर, राज्य कर्नाटक येथून शोधून काढण्यात आले असून, रात्र उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना MIDC पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय?

सोलापूर | दि. ८ ऑगस्ट – सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या फिल्मी स्टाइल अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार तासांत पीडिताची सुटका करून चार आरोपींना लोखंडी हत्यारे आणि पांढरी टोयोटा कारसह ताब्यात घेतले. जुना वैमनस्यातून ही धाडसी घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

घटनेचा तपशील

दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता विष्णु शिवराय हांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा भाऊ शरणु शिवराय हांडे (३६, रा. साई नगर, अक्कलकोट रोड) यांचे समाधाननगर रोडवरील राज बिअर शॉपीच्या मागून ५ ते ६ जणांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अपहरण केले आहे.

तक्रार मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू करत चार स्वतंत्र पथके तयार केली. घटनास्थळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून आरोपी आणि वाहनाचे वर्णन मिळाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तसेच तांत्रिक तपासाद्वारे वाहन कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेण्यात आला.

पाठलाग आणि सुटका

या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. अखेर कर्नाटकातील विजयपूर – सोलापूर महामार्गावरील होर्ती गावाजवळील उड्डाणपुलाजवळ आरोपी आणि पीडित यांना अडवण्यात यश आले. पोलिसांनी शरणु हांडे यांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणासाठी वापरलेली टोयोटा कार (क्र. MH12XX6547) ताब्यात घेतली.

अटकेत आरोपी

  1. अमित म्हाळप्पा सुरवसे (२९, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड, सोलापूर)
  2. सुनिल भिमाशंकर पुजारी (२०, रा. साईबाबा चौक, सोलापूर)
  3. दिपक जयराम मेश्राम (२३, रा. आशा नगर, सोलापूर)
  4. अभिषेक गणेश माने (२३, रा. एकता नगर, सोलापूर)

त्यांच्याकडून लोखंडी हत्यारे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचे उघड झाले आहे.

गुन्हा दाखल

सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९५/२०२५ भा.दं.वि. कलम १४०(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० सह शस्त्र कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परि.) विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष) अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (वि.१) सुधीर खिरडकर, वपोनि प्रमोद वाघमारे, वोनि सुनिल दोरगे, पोनि विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सपोनि भरत चंदनशिव, सपोनि शंकर धायगुडे, पोउपनि महेंद्र गाढवे, पोहेकॉ सचिन भांगे, पोना मंगेश गायकवाड, पोकॉ शैलेश स्वामी, अमोल यादव, अमसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, शंकर याळगी, कुमार बोल्ली, अमर शिवसिंगवाले, किशोर व्हनगुंटी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम, तसेच गुन्हे शाखेतील अंकुश भोसले, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, अभिजतीत धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी मोलाचा वाटा उचलला.

https://www.facebook.com/share/1Ax38RpvcC/?mibextid=wwXIfr
Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

आरोग्यसेवेचा सामाजिक वसा | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचे पोलीस मुख्यालयात मोफत आरोग्य शिबिर

Next Post

राखीच्या धाग्यात बंधुत्वाची गाठ ; अनंत जाधव यांच्या वतीने सामुदायिक सोहळा

Related Posts

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur
गुन्हेगारी जगात

‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

7 October 2025
‘त्या ‘ वृद्धेच्या खूनप्रकरणी  हायकोर्टाचा जामीन ; अ‍ॅड. रितेश थोबडे यांचा ठोस युक्तिवाद..
गुन्हेगारी जगात

‘त्या ‘ वृद्धेच्या खूनप्रकरणी हायकोर्टाचा जामीन ; अ‍ॅड. रितेश थोबडे यांचा ठोस युक्तिवाद..

7 October 2025
पत्नीची छेडछाडचा वाद ; खुनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता..
गुन्हेगारी जगात

पत्नीची छेडछाडचा वाद ; खुनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता..

6 October 2025
12 तास.! बाहुबली मंदिर,धानम्मा देवी मंदिरातील चोरटे जेरबंद — सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी..
गुन्हेगारी जगात

12 तास.! बाहुबली मंदिर,धानम्मा देवी मंदिरातील चोरटे जेरबंद — सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी..

6 October 2025
“त्या” प्रकरणात माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता..
गुन्हेगारी जगात

“त्या” प्रकरणात माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता..

26 September 2025
Next Post
राखीच्या धाग्यात बंधुत्वाची गाठ ; अनंत जाधव यांच्या वतीने सामुदायिक सोहळा

राखीच्या धाग्यात बंधुत्वाची गाठ ; अनंत जाधव यांच्या वतीने सामुदायिक सोहळा

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.