Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
67
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS network

सोलापूर, दि. — विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोझा (वय ३२, रा. नवीन विडी घरकुल) यांच्या खूनप्रकरणी दाखल खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी पुराव्याअभावी सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


या प्रकरणात मूर्तिकार १) नागेश दत्तात्रय लगशेट्टी (वय ४६), २) भूपती उर्फ गोट्या अरुण नारा (वय २४), ३) रमेश उर्फ शाम मल्लेश्याम गुंतुक (वय २४), ४) अमोल दिगंबर संदूपटला (वय २४), ५) गणेश काशिनाथ गडगी आणि ६) संतोष उर्फ सनी श्रीनिवास मरगम (सर्व रा. विडी घरकुल, सोलापूर) यांच्यावर खटला चालविण्यात आला होता.

प्रकरणाची पार्श्वभूमी..


नागेश लगशेट्टी हे गणेश मूर्तीचे व्यापारी असून, मयत विनायक हे मूर्तीचे साचे बनविण्याचे काम करत होते. हातउसने दिलेल्या पैशांवरून वाद निर्माण झाल्याचा आरोप होता. २० एप्रिल २०२४ रोजी विनायक हे गाडीवरून घरी जात असताना स्वराज्य तरुण मित्र मंडळाजवळील मैदानात त्यांना अडवून धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना क्रांती चौक भाजी मंडई परिसरात रस्त्यावर टाकून डोक्यावर सिमेंटचा ठोकळा मारून खून केल्याची फिर्याद मयताची आई राधाबाई बाळकृष्ण बोझा यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयीन निर्णय..


सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे ॲड. मिलिंद थोबडे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचा तसेच कट रचल्याचे ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नसल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.


या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. मनोज पामुल, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डूकर यांनी बाजू मांडली.

Tags: Adv milind thobdeAdv Ritesh thobade
Previous Post

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

Next Post

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.