MH 13 NEWS NETWORK
वाढदिवसाप्रित्यर्थ आमदार देवेंद्र कोठे यांच्या एका स्नेह्याने लिहिलेला गौरवपर लेख..
जनतेच्या आशीर्वादाने राजकारणात पदार्पण करून पहिल्याच प्रयत्नात आमदार म्हणून निवडून आलेले आणि सोलापुरकरांच्या मनात घर करणारे युवा आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस यंदा सोलापुरात उत्साहाने आणि आशीर्वादांच्या वर्षावात विविध सामाजिक उपक्रमाने कार्यकर्त्यांनी साजरा केला.

तात्यांची निस्वार्थ सेवा, महेश अण्णांचा आशीर्वाद, आई-वडिलांची पुण्याई आणि जनतेचं अखंड पाठबळ यांच्या जोरावर नगरसेवक ते आमदार हा प्रवास त्यांनी कार्यकर्त्याचा विजय म्हणून घडवला.

मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय ; सोलापुरकरांचे खरे आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांच्या यादीत कोठे यांचं नाव आज ठळकपणे घेतलं जातं. त्याचं कारण फक्त राजकीय समीकरणं नाहीत; तर अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या सोलापूरला त्यांनी मिळवून दिलेला निधी, प्रलंबित योजनांचा पाठपुरावा आणि “आमदार आपला दारी” अशा उपक्रमातून दाखवलेली जवाबदारी हे आहे.

चहाच्या टपरीपासून शहरातील पंचतारांकित हॉटेलांपर्यंत एकच चर्चा – “हा खरा आमचा युवा नेता.”
कार्यकर्त्यांशी थेट संवाद, लाडक्या बहिणींना हक्काचा वाटणारा ‘दादा ‘, वैद्यकीय उपचारासाठी शासनाकडून निधी आणून रुग्णांसाठी धावपळ करणारा कुटुंबातील सदस्य, हिंदुत्ववादी संघटनेसाठी कणखर, आक्रमक आणि तितकाच अभ्यासू युवा नेता, महापालिका प्रशासनासह जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांवर, खात्यांवर अभ्यासपूर्ण शब्दांची पकड उमटवणारा आमदार.. हा खरा आमचा युवा नेता असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
राजकीय दिग्गजांचं कौतुक
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील अशा दिग्गजांनी कोठे यांच्या कामाचा मनापासून गौरव केला आहे.
तरुण नेतृत्वाला मिळालेलं हे कौतुक केवळ पदसिद्ध नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामामुळे आहे.

देव यज्ञातून जनतेशी थेट संवाद
देवेंद्र कोठे यांनी “देव यज्ञ” आणि आमदार आपला दारी सारख्या उपक्रमातून थेट जनतेपर्यंत पोहोचून संवाद साधला. त्यातून त्यांची जनतेचा आमदार ही ओळख अधिक ठळक झाली.
या कार्यक्षमतेवर सरकारचंही विश्वास बसला आणि त्यांना युवा धोरण समिती सदस्य, विद्यापीठ अधिसभा प्रतिनिधी, भटक्या-विमुक्त जमाती सदस्यपद अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
सोलापुरासाठी केलेला संघर्ष
शहरातील विमानसेवा, पाणी प्रश्न, आयटी पार्क, शालेय वैद्यकीय मदत, आरोग्य शिबिरे, दर्जेदार रस्ते, कोट्यवधींचा निधी – प्रत्येक ठिकाणी कोठे यांची मेहनत दिसून येते.
पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अधिवेशनात त्यांनी अमृत योजना, इलेक्ट्रिक बस, मूर्तिकारांचा उदरनिर्वाह, युवा प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न, भटक्या-विमुक्तांचे घरकुल, रेशन धान्य, धार्मिक पर्यटन, सेटलमेंट भागातील अडचणी, रिंगरोड, गोरक्षकांवरचे खोटे गुन्हे… अशा असंख्य मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधून घेतलं.याच ठिकाणी त्यांचा “हिंदुत्ववादी आमदार” हा ठसा उमटला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
या वाढदिवसानिमित्त मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप नेते शहाजी पवार, अविनाश महागावकर आदींनी शुभेच्छा संदेश पाठवले.
जनतेनेही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष उपस्थितीत “आमदार आपलेच आहेत” हा भावपूर्ण संदेश दिला.
एका राजकीय कारकिर्दीचा प्रवास म्हणजे पदं मिळवणं नव्हे, तर विश्वास जिंकणं. देवेंद्र कोठे यांनी हा विश्वास कमावला आहे.
सोलापूरकरांच्या मनातले ते “युवा आमदार” आहेत आणि त्यांचा वाढदिवस हा खरा तर जनतेच्या विश्वासाचा उत्सव आहे.
एक दादांचा स्नेही..!