MH 13News Network
पुणे – मुंबईला जाणाऱ्या युवकांना सोलापूर शहरांत येणाऱ्या काळात स्टार्ट अप योजनेतून वॉक टू वर्क रोजगार मिळवून देणार असल्याचे आश्वासन डॉ. किरण देशमुख यांनी कॉफी विथ युथ या कार्यक्रमात दिले.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, रिपाइं पक्षाचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ
भारतीय जनता युवा मोर्चा शहर मध्यच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉफी विथ युथ हा युवकांना संवाद साधणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक व युवतींच्या उपस्थितीत पार पडला.
कॉफी विथ युथ कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आयोजक तथा भाजयुमो शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे यांनी केले.
या कार्यक्रमात माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत युवकांशी संवाद साधला. व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, भाजयुमो प्रदेश सचिव गणेश साखरे, भाजपा उपाध्यक्ष जय साळुंखे, भाजयुमो सरचिटणीस बसवराज गंदगे, पंकज काटकर, शहर मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, सिध्दारूढ हितनल्ली अंबादास पामू, समर्थ होटकर, अनिल अंजनाळकर, शांतेश स्वामी उपस्थित होते.
प्रस्तावीक भाजयुमो सरचिटणीस वैभव हत्तुरे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रेम भोगडे यांनी तर भाजयुमो सरचिटणीस सिद्धार्थ मंजेली यांनी आभार मानले.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे युवकांना संवाद मार्गदर्शन करताना म्हणाले, २०१४ पूर्व भारत देशात कधी व कोठेही बॉम्बस्फोट मालिका घडत होत्या. देशाच्या महानगरात चाकरमानी हे कामावर गेल्यानंतर घरी येतील याची खात्री नसायची. असुरक्षित देशाला २०१४ पासून मिळालेले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अंतर्गत व सीमेवर घेतलेल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक धाडसी निर्णय व त्याची अंमलबजावणीमुळे सीमेवरील व देशांतर्गत सुरक्षितता मध्ये भारत देशातील सर्वसामान्य नागरिक हा भारताचा नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन म्हणून जाऊन आज पर्यटनाचा आनंद घेतोय. सुरक्षित व सुबत्ता आणणाऱ्या कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपण युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावीत आपलं भविष्य अधिक सुरक्षित करूया असे आश्वस्त केले.