Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालये आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आणि काही भाडेत्त्वावरील जागेत आहेत. या सर्व कार्यालयांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी चेंबूर येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला अधिक गती देऊन पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज चेंबूर येथे उच्च शिक्षण विभागासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, चेंबूर येथे उभारण्यात येत असलेल्या इमारतीत रुसा (आरयुएसए), राष्ट्रीय सेवा योजना, विभागीय सहसंचालक कार्यालय, शिक्षण शुल्क नियमन समिती, महा-सार्क यांसह उच्च शिक्षण विभागाची अन्य कार्यालये एकत्रितपणे कार्यरत होतील. यामुळे विभागीय कामकाजातील समन्वय सुलभ होईल आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, शैक्षणिक कार्याला अधिक गती मिळेल. या कामांना गती देण्यासाठी, चेंबूर येथील चालू बांधकामाच्या समन्वयासाठी प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे समन्वयक म्हणून नेमणूक करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

शैक्षणिक संकुल कार्यान्वित झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय सेवांना गती आणि विद्यार्थ्यांना, नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा, माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यासाठी संबंधित विभागांनी निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. बैठकीत प्रकल्पाची प्रगती,  बांधकामाची गुणवत्ता, रचना आणि विभागीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत तसेच पुढील कामकाजाची रूपरेषा याबाबत  सविस्तर आढावा घेण्यात आला.

Previous Post

‘आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

Next Post

राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन ‘आदी चित्र’चे मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन ‘आदी चित्र’चे मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन ‘आदी चित्र’चे मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.