Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

निवडणूक आयोगासाठी निवडणूकांच्या काळात माध्यमे आयोगाचे कान आणि डोळे आहेत. माध्यमात पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात (प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स) कोणतेही प्रसारीत किंवा प्रकाशित वृत्त यावर माध्यम संनियत्रंण चे विशेष लक्ष व नियत्रंण राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार यांच्याकरिता आयोजित बैठकीदरम्यान माहिती दिली.

15 डिसेंबर 2025 पासून शहरांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याकरिता एकूण 3115 बॅनर फलक,101 झेंडे हे काढून टाकले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन हे प्रत्येकाने करायचे असून, कोणताही पक्ष अथवा उमेदवार यांनी धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. प्रतिस्पर्ध्यांच्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.

तसेच प्रार्थना स्थळाचा निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी‌. याबाबत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदर्श आचारसंहिता बाबत एकत्रित आदेशातील सर्व सूचना या सर्व उपस्थितांना देण्यात आल्या व आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सोशल मीडिया जसे की टीव्ही, रेडिओ, फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर इत्यादी यांचा वापर करून प्रचार करण्याबाबत कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सोलापूर महानगर पालिके करिता माननीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे समितीची रचना करण्यात आलेली आहे.

महानगरपालिका आयुक्त (अध्यक्ष)

पोलीस आयुक्त (सदस्य)

अतिरिक्त आयुक्त -1 ( सदस्य)

आचारसंहिता कक्ष प्रमुख (सदस्य)

जनसंपर्क अधिकारी म.न.पा सोलापूर (सदस्य सचिव)

नॉर्थकोट प्रशाला येथे सदर समितीचे व मीडिया कक्षाचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आज रोजी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार देण्यात आली. यामध्ये उमेदवारांनी प्रचार करीत असताना सदरील प्रचाराबाबतची पूर्व परवानगी व प्रमाणीकरण करणे शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आलेले आहे. याबाबत ही माहिती देण्यात आली.

Solapur Municipal Corporation, Solapur

Previous Post

राज–उद्धव ठाकरे एकत्र : सोलापुरात जल्लोष, मराठी ऐक्याचा जयघोष

Next Post

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.