Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रभाग ६ मध्ये ‘विकासगंगा’ आणण्याचा शब्द; देगावमध्ये भाजप प्रचाराचा नारळ, विजयी सभेचा जल्लोष!

mh13news.com by mh13news.com
7 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
प्रभाग ६ मध्ये ‘विकासगंगा’ आणण्याचा शब्द; देगावमध्ये भाजप प्रचाराचा नारळ, विजयी सभेचा जल्लोष!
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर – (प्रतिनिधी)

केंद्र व राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरीव विकास झाला असून, सोलापूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता येणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजारोंच्या साक्षीने दिला.

सोलापूर महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांची रेकॉर्डब्रेक उपस्थिती लाभली. सभामंडप गर्दीने ओसंडून वाहत होता.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली असून लाडक्या बहिणी समाधानी आहेत. स्मार्ट सिटी, विमानसेवा, आयटी पार्क आणि नियमित पाणीपुरवठ्यासारखी कामे भाजप सरकारने केली आहेत. वानकर परिवार भाजपमध्ये आल्यामुळे प्रभाग ६ चा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वानकर परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश हा विकासाच्या विचारातून झाल्याचे सांगत, “आता प्रभाग ६ मधून भाजपच निवडून येणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला. ही प्रचारसभा नसून विजयी सभाच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष मनिष देशमुख, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांच्या आगमनावेळी परिसर जय श्रीराम आणि वंदे मातरम् घोषणांनी दणाणून गेला.

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, विरोधात राहून विकास शक्य नाही, ही जाणीव झाल्यामुळे वानकर परिवार सत्तेसोबत म्हणजेच भाजपसोबत आला आहे. प्रभागाचा विकास हेच अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी “शत-प्रतिशत भाजप”चा नारा दिला, तर उमेदवार सुनील खटके व मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी वानकर परिवारातील तिसरी पिढी – समर्थ, विश्वजीत आणि अभय वानकर यांनी भाजपसोबत जनसेवेची सुरुवात केली. त्यांच्या प्रवेशाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले की, यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

Previous Post

प्रभाग ६ | आज रविवारी भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; ‘देगाव’मध्ये पालकमंत्री यांचा जनसंवाद..

Next Post

अक्कलकोट : प्रियकराकडून २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न — प्रकृती नाजूक

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
अक्कलकोट : प्रियकराकडून २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न — प्रकृती नाजूक

अक्कलकोट : प्रियकराकडून २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न — प्रकृती नाजूक

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.