mh 13 news network
पुणेकरांचं ठरलंय, साथ अन् मत केवळ राष्ट्रवादीला..!

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पक्षाला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हा खरोखरच समाधान देणारा आहे. पुणे हे फक्त शहर नाही, तर राज्याच्या प्रगतीत भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक मुख्य शहर आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणारी, सक्षमपणे निर्णय घेणारी आणि जबाबदारी स्वीकारणारी माणसं हवीत.

यंदाची ही निवडणूक म्हणजे भाषणांची नाही, तर कामांची परीक्षा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण हे मुद्दे तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. यावर ठोस काम करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
सामान्य पुणेकराचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी, भविष्यातील पुणे अधिक सुरक्षित, अधिक स्वच्छ आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी, तुमचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला हवा आहे.
मी शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवतो. पुण्याच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडणार








