Friday, April 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांना २५ हजार रुपयांचा दंड; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

नायलॉन मांजामुळे जीवघेणे अपघात व यात निष्पाप लोकांसह पक्षांचे पडणारे बळी लक्षात घेता  मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास 2 लाख 50 हजार रुपये दंड आणि नायलॉन मांजा वापरणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी दिले. अल्पवयीन मुले आढळल्यास त्यांच्या बाबतीत हा दंड त्यांच्या पालकांकडून वसूल केला जाईल. याचबरोबर हा दंड प्रत्येक वेळी झालेल्या उल्लंघनासाठी आकारण्यात येईल, असे न्यायालयीन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दंड स्वरुपात वसूल करण्यात आलेली रक्कम ही एका सार्वजनिक कल्याण निधी या नावाने बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये प्रशासनातर्फे जमा करण्यात यावी. सदर खाते जिल्हाधिकारी, नागपूर, महानगरपालिका आयुक्त, तसेच मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील निबंधक (प्रशासन) यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे उघडण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून वसूल करण्यात आलेली दंडाची संपूर्ण रक्कम वरील खात्यात जमा करण्यात येईल. ही रक्कम नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या कोणत्याही पीडिताच्या उपचारासाठी वापरली जाईल. अशा पीडितास दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे प्रमाण संबंधित समितीद्वारे निश्चित करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दोषी आढळलेले व्यक्ती अथवा पालक जर तात्काळ दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असतील, तर संबंधित अधिकारी त्यांना 15 दिवसांच्या आत वरील दंडाची रक्कम नमूद खात्यात भरण्याची नोटीस काढतील. ही रक्कम जमा न केल्यास त्या-त्या जिल्ह्यातील संबंधित महसूल अधिकारी कायद्यानुसार प्रक्रिया राबवून सदर दंडाची रक्कम महसूल प्रक्रियेप्रमाणे थकबाकी वसूल करतील, असे आदेशात म्हटले आहे.

याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील सायबर सेलने नायलॉन मांजाच्या वापराबाबत तक्रारी किंवा माहिती प्राप्त करण्यासाठी एक व्हॉट्सॲप गट (WhatsApp Group) तयार करुन यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्याची कार्यपद्धती पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक / उप पोलीस आयुक्त यांनी निश्चित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नायलॉन मांजामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास, ज्या क्षेत्राच्या हद्दीत ती घटना घडली आहे त्या क्षेत्रातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यास, न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांनी बजावण्याचे आदेशात म्हटले आहे. संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांनी नायलॉन मांजाच्या वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेबाबत दि. 13 व 14 रोजीच्या दैनिकांमध्ये जाहीर नोटीसीद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्याचे नमूद केले आहे. या दंडाबाबत माहिती नसल्याचे कोणत्याही दोषी व्यक्तीला म्हणता येणार नाही, असे आदेशात न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोणालाही दंड भरण्याबाबत हा निर्णय आम्हाला माहित नाही असे दोषी व्यक्तींचे म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही, असे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”

Next Post

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.