MH13 News
सोलापूर : BR Friends या सामाजिक ग्रुपच्या संस्थापक माया कांबळे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चंडक प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला चंडक प्रशालेचे देशपांडे , वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष महेश जाधव, विनोद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, विश्वभून कांबळे, मयूर भंडारे, सचिन सावंत, प्रशांत सोनवणे, साहिल मस्के, आनंद पँथर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या BR Friends च्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.







