MH13 News network
सोलापूर : प्रतिनिधीजिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागात दीर्घकाळ सेवा बजावलेले तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सुखदेव देवकर (वय ६६) यांचे शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथे दुःखद निधन झाले.
तुकाराम देवकर यांनी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागात शाखा अभियंता म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता म्हणून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, सोलापूर येथे जबाबदारी सांभाळली.शासकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ते मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी त्यांच्या मूळ गावी बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








