MH13 News network
मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा; ५७० मतदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे पत्र सुपूर्द
सोलापूर : प्रतिनिधी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, मनपा यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देणारे पत्र संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या हस्ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासह शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. या प्रश्नांबाबत शिक्षक आणि पदवीधरांशी चर्चा केल्यानंतर त्यांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचे संघटनेचे मत झाले. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना संघटनेने पाठिंबा दिला असल्याचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी सांगितले.

संघटनेचे ५७० मतदार मतदान करणारमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदवीधर मतदारसंघात ३५०, तर शिक्षक मतदारसंघात २२० मतदार आहेत. हे सर्व मतदार महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याचे जवंजाळ यांनी यावेळी सांगितले.पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करताना संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, राज्य प्रतिनिधी स्वप्निल चाबुकस्वार, संघटक आनंद सामल, राहुल पाटील, किरण शेळगे, रणधीर तांबिले, केशव गलगली, धीरज कुचेकर, बसवराज माळी, विठ्ठल वाघमोडे, मिलिंद खंदारे, संतोष सुतार, विशाल मनाळे, गंगाधर कांबळे आणि विजय टेकाळे आदी उपस्थित होते.







