मुंबई :राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिवस एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्था, मुंबई येथे साजरा करण्यात आला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षांच्या नियोजन अहवालाचे (व्हिजन डाक्युमेंट) प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक मेघना गुलजार, कौशल्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणि तिवारी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.अपूर्वा पालकर, कौशल्य आयुक्त निधी चौधरी तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
0000