Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

मनपा आयुक्‍त डॉ. डोईफोडे यांनी लोकशाहीच्‍या बसमध्‍ये मतदान करुन स्‍वार होण्‍याचे केले आवाहन

सीईओ यांच्‍या आवाजातील उद्घोषणेने नांदेड बसस्‍थानकावरील प्रवाशी स्तिमित

 नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीप अंतर्गत जनजागृतीला प्रवाशांचा प्रतिसाद

नांदेड : बसस्‍थानकावरील ‘फलाट क्रमांक १ वर लागलेली गाडी …..’, अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज सकाळी १०.१५ वाजताच्‍या सुमारास वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची तिकिट काढण्‍यासाठी, आपल्‍या पसंतीच्‍या उमेदवाराला २६ एप्रिलला मतदान करण्‍यासाठी विसरु नका !

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे जिल्‍हास्‍तरीय स्‍वीप समीतीचे प्रमुख आहेत. आज या उपक्रमांतर्गत जनतेचे प्रबोधन करण्‍यासाठी दोन्‍हीही अधिकाऱ्यांनी सकाळीच बसस्‍थानक गाठले. सकाळी जवळपास तासभर स्‍वीपची समिती आणि हे दोनही अधिकारी बसस्‍थानकावरील विविध उपक्रमामध्‍ये सहभागी झालेत.

आज सकाळी नांदेडच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकावर उभय अधिका-यांनी ‘मी मतदान करणार’ या सेल्‍फी पॉईंटचे उद्घाटन केले. त्‍यानंतर त्‍यांनी नांदेड जिल्‍ह्यातील अनेक बसेसवर स्टिकर चिटकवून प्रचार मोहिमेत सहभाग घेतला. २६ एप्रिलला प्रत्येक नागरिकांनी मताधिकार बजावावा , असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.

नांदेड जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्‍या मार्गदर्शनात यावर्षी ८० टक्‍के मतदानाचे उद्दिष्‍ट जिल्‍ह्यामध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. त्‍याअंतर्गत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्‍यापुर्वीपासून जिल्‍ह्यामध्‍ये वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यात येत आहे. सर्व महाविद्यालयीन तरुणांना यामध्‍ये सहभागी करण्‍यात आले आहेत. याशिवाय ८ मार्च ला जागतिक महिला दिनी महिला रॅली काढून जनजागृती करण्‍यात आली होती. त्‍यानंतर युवकांमध्‍ये स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच मतदान जनजागृती अभियान राबविण्‍यात आले. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला. याशिवाय उमेदच्‍या २ लाख महिलांसोबत एकाचवेळी शपथ आणि संवाद, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांशी संवाद असे विविध उपक्रम जिल्‍ह्यामध्‍ये सुरु आहे. त्‍याला उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे.

आजच्‍या बसस्‍थानकावरील उपक्रमामध्‍ये एसटीचे विभाग नियंत्रक चंद्रकांत वडजकर, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, यंत्र अभियंता मंगेश कांबळे, वाहतूक अधीक्षक कमलेश भारती, आगार व्‍यवस्‍थापक अनिकेत बल्‍लाळ, बसस्‍थानक प्रमुख यासीन खान यांच्‍यासह संगीता साळुंके, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुधीर शिंदे, रवी ढगे, डॉ. राजेश पावडे, सारीका अचमे, सुनील मुत्‍तेपवार, शंकरराव नांदेडकर, साईनाथ चिंद्रावार, आशा घुले, शुभम तेलेवार आदींचा समावेश होता.

Previous Post

अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
Next Post
अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.