MH 13 News Network
तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात
सोलापूर,(प्रतिनिधी)ः- 100 वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅप च्या पडदा, कुशन, सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दि. 9 जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन्स वसंत फर्निशींग्सचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गिरणगांव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन 1920 मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर 1962 दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली. नंतर व्यवसायामध्ये वृध्दी होत गेली. गोविंदराव डोईजोडे यांच्या नंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या 7 भावांनी मिळून वसंत कॅप च्या माध्यमातून घराला लागणार्या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे, सोफा कुशन अशा विविध वस्तुच्या विक्री मधून वसंत कॅप नावाचे ब्रँन्ड तयार केले.
तुमची पसंद आमची पसंद वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली. सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नावलौकीक वाढवला.
या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येवून वसंत कॅप मधून विविध वस्तुची खरेदी करू लागले. डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करीत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली. सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणूनच अश्विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूर मधील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकुलीत असे अश्विन्स वसंत फर्निशींग्स शोरूम सुरू केले.
या अश्विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडिमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंडस, रोलर ब्लाईंडस, झेब्रा ब्लाईंडस,ब्लॅक आऊट ब्लाईंडस, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, नामवंत कंपन्याचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या, कारपेट अशा वस्तु उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डि डेकोर, केबी डिकोर, एस एन डिकोर, हरित अशा प्रसिध्द कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किंमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली.
तसेच नव्याने सुरू झालेल्या या वातानुकुलीत अश्विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये बॉम्बे डाईंगसह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीटही उपलब्ध आहेत. 100 वर्षापासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून डोईजोडे परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे. जुळे सोलापूरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचे वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत. यावेळी सुर्यकांत डोईजोडे, अशोक डोईजोडे, अमोल डोईजोडे, अजय डोईजोडे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.