Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणीला गती द्यावी – मंत्री शंभुराज देसाई

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणीला गती द्यावी – मंत्री शंभुराज देसाई
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

बई, : उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रासाठी वाटोळे, (ता.पाटण, जि. सातारा) येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र उभारण्यासाठी जमीन ताब्यात घेऊन प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करण्यात यावी. उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले तसेच प्रशिक्षण केंद्र अंतर्गत प्राधान्याने पुरूष व स्त्री वसतिगृह, ग्रंथालय व मुख्य इमारत प्रधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

मंत्रालयात प्रशिक्षण केंद्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक प्रसार सुर्वे, कोल्हापूर विभागाचे उपायुक्त श्री. चिंचाळकर, उपसचिव रविंद्र औटी, अवर सचिव संदीप ढाकणे आदी  उपस्थित होते.

वाटोळे येथील जागा ताब्यात घेवून बांधकामासाठी आवश्यक परवानग्या काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने जमिनीचा ताबा उत्पादन शुल्क विभागाला द्यावा. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा तसेच हेलिपॅड आदी सुविधांचा समावेश असणार आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राधान्यक्रमानुसार बांधकामे करण्यात यावी. क्रीडा विषयक सुविधांचीही उभारणी करण्यात यावी.

यावेळी उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल पदक व सन्मानचिन्ह प्रदान करण्याच्या योजनेचाही आढावा घेण्यात आला. पदक निवडीबाबत अटी, निवड समित्या, पदकांचे प्रकार आदींबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली. बैठकीला वन, सार्वजनिक बांधकाम, महसूल व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि पत पुरवठा वेळेवर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.