Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बनावट, अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई 

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
बनावट, अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई 
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

मुंबई : बनावट मद्य निर्मिती, परराज्यातील अवैध मद्य विक्रीची प्रकरणे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे विभागाने या प्रकरणांमध्ये धडक कारवाई करावी. परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व विक्री सीमेवरील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होत असते. या जिल्ह्यांतील कारवाईचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे सामाजिक व आर्थिक अनुकूल परिणाम जनतेसमोर आणावेत. विभागाचे स्वत:चे बँड पथक तयार करण्यासाठी प्रशिक्षक देण्यात यावे. या पथकाला विशिष्ट असा गणवेश देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अपर आयुक्त यतीन सावंत, सह आयुक्त सुनील चव्हाण, संचालक प्रसाद सुर्वे, उपसचिव रवींद्र आवटी, उपायुक्त सुभाष बोडके, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग शासनाला महसूल देणारा विभाग आहे. त्यामुळे विभागाचे बळकटीकरण आवश्यक आहे. यासाठी अधिकाधिक निधीची मागणी करण्यात यावी.  विभागाला दिलेल्या महसूल उद्दिष्ट पूर्तीसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रयत्न न करता सुरूवातीपासूनच प्रयत्न करावेत. त्यामुळे विभागाला दिलेल्या महसूल प्राप्तीची उद्दिष्टपूर्ती होईल.

अधिकारी गणवेश भत्ता दरवर्षी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. पोलिसांप्रमाणे हा भत्ता देता येईल. अनुज्ञप्तीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हातभट्टीवरील अवैध मद्य निर्मिती किंवा शहरात दाटीवाटीच्या वस्तीमध्ये, चिंचोळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मिती, विक्री व्यवसायावर कारवाई करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात यावा. त्यासाठी प्रत्येक अधीक्षक कार्यालयाला ड्रोन असायला पाहिजे. त्या पद्धतीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. दारूबंदी गुन्हे अन्वेषण, सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. आंतरराज्य अवैध मद्याची आवक राज्यात होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

दरम्यान, मद्य, मद्यार्क, मळीचे नमुने पडताळणी करण्यासाठी उभारावयाच्या प्रयोगशाळा,  विभागातील रिक्त पदांची भरती, इमारती बांधकाम, हातभट्टी दारू निर्मूलन मोहिमेचे फलित आदींचा आढावाही घेण्यात आला. उपायुक्त श्री. बोडके यांनी विभागाचे सादरीकरण केले. बैठकीला राज्यभरातील अधीक्षक उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत – कृषी विभागाचे आवाहन

Next Post

विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर            

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर              

विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.