Tuesday, February 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

सोलापूर :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागानी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत लक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

भक्तनिवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, आषाढी वारीनिमित्त दिनांक 17 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्रीच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होते. यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मागील दोन महिन्यापासून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सांगण्यात आलेले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पंढरपूर शहरातील रस्त्यावरील वीज वितरण कंपनीचे पोल तसेच चौका चौकामधील होर्डिंग नगर परिषदेने त्वरित काढून घेऊन रस्ते मोकळे करावेत. तसेच नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे त्वरित भरून घ्यावेत. चंद्रभागा वाळवंटातील चेंजिंग रूम ची संख्या वाढवून घ्यावी. ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे अशा ठिकाणी त्वरित खडी व मुरूम भरून घेऊन पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरात स्वच्छता राखण्यासाठी आधीकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

आरोग्य विभागाने अतिदक्षता विभागात फॅन व कुलरची संख्या वाढवावी. तसेच वाखरी पालखीतळ व 65 एकरवर आरोग्य सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या ठिकाणीही फॅन व कुलरची व्यवस्था करून घ्यावी. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आरोग्य पथके तयार ठेवावीत. दुचाकी वरील आरोग्य दूत सेवा अत्यंत चोख राहील यासाठी दक्ष रहावे. वीज वितरण कंपनीने पुढील तीन दिवस पंढरपूर शहरात वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्ष रहावे. पंढरपूर प्रांत अधिकारी यांनी मटन व चिकन शॉप बंद राहतील याबाबत आदेश काढावेत. चंद्रभागा नदीमध्ये बोटी चालवणाऱ्या नाविकांना लाईव्ह जॅकेटचे वितरण करावे तसेच विना जॅकेट नदीमध्ये बोट चालवल्यास संबंधिताची बोट सीज करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

सर्व शासकीय विभाग प्रमुख त्यांच्यावर वारीच्या पार्श्वभूमीवर सोपवण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. परंतु शेवटचे तीन दिवस महत्त्वाचे असून प्रत्येकाने अत्यंत दक्षपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

Previous Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना मिशन मोडवर राबवावी – पालकमंत्री दादाजी भुसे

Next Post

शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी -पालकमंत्री दादाजी भुसे

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी -पालकमंत्री दादाजी भुसे

शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी -पालकमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.