Tuesday, February 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
80
VIEWS
ShareShareShare

खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

नांदेड जुलै : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना नियुक्तीपत्र देऊन या प्रशिक्षण योजनेची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात जिल्ह्यात आज करण्यात आली.

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून  कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा यादृष्टीने ही ६ महिन्यांच्या नियुक्तीची योजना आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे  घडविता येणार आहे.

आज दुपारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे पहिले कार्यादेश प्रदान करण्यात आले.सुप्रसाद सूर्यकांतराव दामेकर, देगलूर, अंजली राजेंद्र आवतिरक, पाथरड रेल्वे, ता. मुदखेड, विश्वजीत रंजू खानसोळे, ओमकेश्वर संतोष कुमार उपलवाड असे कार्यादेश दिलेल्या या चार उमेदवारांचे नाव आहे. यापैकी सुप्रसादला तहसील कार्यालय देगलूर तर अन्य तीन उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी कामकाज सोपविण्यात आले आहे.

या प्रतिनिधीक व छोटेखाली कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

ही कार्य प्रशिक्षण योजना 6 महिन्यासाठी असून रितसर नोंदणी करुन रुजू झालेल्या बारावी पास उमेदवारांना  6 हजार रुपये, आयटीआय/पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदविधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10  हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल. बारावी, आय. टी. आय. पदविका, पदवीधर व पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जावून आपल्या लॉगिन आयडी पासवर्ड च्या माध्यमातून पोर्टलवर CMYKPY अंतर्गत नोंदविलेल्या विविध रिक्तपदांना ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Previous Post

पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

Next Post

जरांगे पाटलांचा वाढदिवस रक्तदानाने होणार साजरा ; या गावाचा संकल्प

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

जरांगे पाटलांचा वाढदिवस रक्तदानाने होणार साजरा ; या गावाचा संकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.