Tuesday, November 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाच्या नूतन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाच्या नूतन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाल्याचे समाधान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला, याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (14 ऑगस्ट रोजी) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी. जी. गोदेपूरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  या इमारतीचे काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले आहे. सर्व सोयींनी युक्त असे वातानुकुलित प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.

प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार कऱण्यात आली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे. मी कधीही अचानक भेट देईन तेव्हा हे प्रसूतिगृह मला याच स्थितीत दिसले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.

श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्ण खाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही. ती काळजी सरकार घेत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले.

 प्रशिक्षण नियुक्ती पत्रे प्रदान

याच लोकार्पण सोहळ्यात  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या १० प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्ती पत्रे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  देण्यात आली. त्यात एका दिव्यांग युवकाचाही समावेश होता.

ठाणे महापालिकेत ५४३ तर परिवहन सेवेत १७२ युवकांना अशा प्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या प्रसूतिगृहाची उत्तम वास्तू व व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, फेरफॅक्स इंडिया, सीएसबी बँक आणि अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी या सर्वांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र

ठाणे महापालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रम राबविताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतिगृहांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. वागळे प्रभाग समिती अंतर्गत १० खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मागील तीस वर्षापासून कार्यान्वित आहे.  या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोअर स्लॅब पडणे , अशा प्रकारची नादुरुस्ती झाली होती. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपये खर्च करून या वास्तूचे बळकटीकरण करण्यात आले आहे.

स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथे आता ०७ खाटांचा एएनसी वॉर्ड, १० खाटांचा पीएनसी वॉर्ड, दोन खाटांची रिकव्हरी रूम, न्यू बॉन्सेबलायझेशन युनिट, लेबर रूम, मॉड्युलर ओटी (अद्ययावत शस्त्रक्रियागृह), ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे.

त्याचबरोबर माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत दररोज प्रसूतीविषयक सेवा,  नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण साधने, महिलांच्या आजारासंबंधी दैनंदिन स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याद्वारे कन्सल्टेशन, गरोदर मातांच्या रक्त चाचण्या,गरोदर मातेची सोनोग्राफी तसेच प्रसूतीपश्चात द्यावयाच्या सेवा , नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी न्यू बॉर्न स्टेबलायझेशन युनिट ज्यामध्ये फोटोथेरेपी, बेबी वॉर्मर या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

तसेच या ठिकाणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे. याकरिता डायलिसिस मशीन या सीएसआरच्या माध्यमातून फेरफॅक्स इंडिया व सीएसबी बँक यांच्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.   हे डायलेसिस केंद्र हे मेसर्स अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालविण्यात येणार असून गरजू रुग्णांना डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Previous Post

एकही नागरिक व शेतकरी आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही 

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद-सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक लढा

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!
महाराष्ट्र

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!

18 October 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद-सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक लढा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद-सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.