Sunday, November 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार 

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार 
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील  “सोनेरी पान” आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत करणाऱ्या सरदारांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरक असल्याने हा ठेवा जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

पुरातन वारसा जतन-संवर्धन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांसोबत  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगुंटीवार यांनी समितीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी एस. उगले, समितीचे कार्याध्यक्ष इंद्रजित जेधे, सदस्य अनिकेत बांदल, श्रीनिवास इंदलकर, ऋषिकेश नाईक -निंबाळकर, निळकंठ बावडेकर, अभय राज शिरोळे, रवींद्र कंक, सचिन भोसले, गोरख करंजावणे आदी सदस्य, इतर अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत लढणारे मावळे आणि सरदार शूर वीर आणि धैर्यवान होते. रयतेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या सरदारांशी संबंधित पुराभिलेख, दस्तऐवज, त्यांनी युद्धकाळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, त्यांच्या निवासाचे वाडे शूरतेचा, वीरतेचा व समृद्धीचा वारसा सांगणारे आहेत. ज्यांनी आपल्यासाठी प्राण त्यागले त्यांच्यासाठी आपण वेळ खर्च करून येणाऱ्या  पिढीला सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे.

या पुरातन  बाबींचे  विभागाच्या माध्यमातून जतन केले जावे व महाराष्ट्राच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरावे, या दृष्टीने समिती सदस्यांनी चर्चा केली. समिती सदस्यांच्या सर्व मागण्यांचा व सूचनांची दखल घेऊन त्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी  दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून  ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनासाठी राज्यात अद्ययावत संग्रहालय उभारण्याचा विचार  असून ते देशातले सर्वोत्तम संग्रहालय ठरेल, अशा पद्धतीने त्याचे दर्जेदार काम उभारवयाचे आहे. राज्यातील शिवकालीन वस्तू, सरदारांचे वाडे तसेच त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि वस्तू यांची यादी तयार करण्याचे निर्देश देखील मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. या विषयी क्यू आर कोड सह एक माहिती पुस्तिका व बदलत्या काळानुरूप डिजिटल डॉक्युमेंटेशन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले

Previous Post

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ

Next Post

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!
महाराष्ट्र

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!

18 October 2026
Next Post
पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.