Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्नशील

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्नशील

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

0
SHARES
49
VIEWS
ShareShareShare

मुंबई :- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षणाचा लाभ देण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीस मुदतवाढ देण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली होती. त्यानुसार समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच सकल धनगर समाजाच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासन गंभीर असून सकारात्मक प्रयत्न करीत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे सांगितले.

सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयातील समिती कक्षामध्ये आयोजित बैठकीत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे, माजी आमदार प्रकाश शेंडगे,  विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव व विधी परामर्ष सुवर्णा केवले, प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार उदय शुक्ला, समन्वय समितीचे विजय गोफणे आदींसह सदस्य उपस्थित होते.

उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने दिलेलया अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यात यावी. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णयाच्या प्रारूपासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने तातडीने अहवाल सादर करावा.

शिक्षक भरतीत धनगर समाजास टक्केवारीनुसार पदे उपलब्ध करून देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सोमवारी 23 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्याच्या सुचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. बैठकीत सकल धनगर समाज समन्वय समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

Next Post

महाराष्ट्र शासनाचे ८, १२, १४ व १९ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार

महाराष्ट्र शासनाचे ८, १२, १४ व १९ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.