Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Breaking: जरांगे पॅटर्नसाठी सोलापुरात इच्छुकांचा मेळावा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Breaking: जरांगे पॅटर्नसाठी सोलापुरात इच्छुकांचा मेळावा..
0
SHARES
526
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण राज्यात होत आहे. लढायच की पाडायचं यावर मराठा समाजाकडून मत जाणून घेण्याचे काम जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीवेळी केले होते. अगदी तसाच पॅटर्न पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत केला जात आहे. राज्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर आज शनिवारी दुपारी इच्छुकांचा मेळावा घेण्यात आला होता. जरांगे उमेदवार नक्की उभे करणार की महायुतीतील उमेदवार पाडणार हे अजून फिक्स झाले नाही.

मराठा समन्वयक माऊली पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या भेटीचे नियोजन केले होते. त्यास खूप मोठा प्रतिसाद मिळाला. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुल या ठिकाणी शेकडोच्या संख्येने 11 तालुक्यातील उमेदवार आले होते.

सकल मराठा समाजाचे राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख,शिवाजी चापले,डॉ. प्रमोद पाटील, सचिन तिकटे यांनी इच्छुक उमेदवारांकडून कार्य अहवाल आणि माहिती जमा करण्याचे काम केले.

दरम्यान, प्रा. गणेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, राजन जाधव, महेश पवार, समन्वयक माऊली पवार, सचिन पवार यांनी उपस्थित इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.

माढ्याचे नगराध्यक्ष ॲड.मीनल साठे, बार्शीचे माजी पोलीस अधिकारी आंधळकर, प्रा.रामदास झोळ, ॲड.आडकर,रवी मोहिते, मारुती सावंत, प्रियंका डोंगरे, मुस्लिम समाजाचे नेते मतीन बागवान, मोहोळ मतदार संघासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती कल्पना क्षीरसागर यांचे पती राहुल क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या भक्ती जाधव यांच्यापासून सर्वसामान्य रिक्षाचालक पिंटू माने यांच्यापर्यंत इच्छुक उमेदवार होते. जवळपास 150 इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याची माहिती निरीक्षकांना दिली.

मेळाव्यात विविध जातीधर्माच्या उमेदवारांचा समावेश होता.उद्या रविवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांमधून उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ॲड. श्रीरंग लाळे, सचिन काळे, आनंद काशीद, मनमोहन चोपडे,दत्ता भोसले,सचिन गुंड, सौदागर जाधव, महादेव गवळी, कल्याण गव्हाणे, पात्रे, पंडित धवण यांच्यासह विविध समाजातील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: manoj Jarange Patilmaratha aarkshanMaratha reservationsolapurSolapur Maharashtra
Previous Post

मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी

Next Post

दक्षिण काँग्रेसचा नेता थेट राज ठाकरेंच्या घरी..! रेल्वेचे इंजिन सोलापुरात धावणार..?

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
दक्षिण काँग्रेसचा नेता थेट राज ठाकरेंच्या घरी..! रेल्वेचे इंजिन सोलापुरात धावणार..?

दक्षिण काँग्रेसचा नेता थेट राज ठाकरेंच्या घरी..! रेल्वेचे इंजिन सोलापुरात धावणार..?

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.