MH 13News Network
अश्विनी सहकारी रुग्णालयातील ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. शशिकांत गंजाळे यांना मानाचा पुरस्कार प्रदान
त्रिचनापल्ली तामिळनाडू येथे 16 मार्च 2024 रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये बारा विविध देशांमधील निवडलेल्या संशोधनामधून अश्विनी सहकारी रुग्णालयातील नामवंत ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. शशिकांत गंजाळे यांच्या संशोधनाला मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. शशिकांत गंजाळे यांच्या हिप फिक्सेशन नेल HFN (Hip Fixation Nail) या खुब्याच्या सांध्याला असणाऱ्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत ऍ़डव्हान्स इनोव्हेटिव्ह Implant ला सर्वोत्तम शोधनिबंधाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. त्रिचनापल्ली, तामिळनाडू येथे आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमामध्ये इंटरनॅशनल काँग्रेस फॉर रिसर्च एक्सलेंस तर्फे अश्विनीचे ऑर्थोपेडीक सर्जन डॉ.शशिकांत गंजाळे यांना “International Best Researchers Award” ने सन्मानित करण्यात आले.
रुग्णाचे खुब्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रिया करून बसविण्यासाठी विविध प्रकारचे इम्प्लांट सध्या उपलब्ध आहेत. फ्रॅक्चरचे प्रकार, इम्प्लांटची किंमत, सर्जनचे कौशल्य आणि उपलब्धता अशा बऱ्याचशा गोष्टी मधून आपण योग्य ते इम्प्लांट निवडत असतो.
डॉ.शशिकांत गंजाळे यांनी डिझाईन केलेलं हे HFN (Hip Fixation Nail) नेल वापरण्यास फार सोपं व किंमतीत खूप कमी आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध ब्रँड मधून हे HFN (Hip Fixation Nail) रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. उदा :- लवकर त्या पायावर भार देऊन चालणे, स्वावलंबी होणे, हाड जुळण्यासाठी उपयुक्त इत्यादी. डॉ.शशिकांत गंजाळे यांनी यावर शोधनिबंध सुध्दा प्रसिध्द केलेले आहेत.
डॉ. शशिकांत गंजाळे यांनी आतापर्यंत खुब्याचे तुटलेले हाड बसविण्यासाठी उपयुक्त awl व स्पेशल TBP (Trochanteric Buttress Plate) प्लेटचा शोध लावला असून ते सध्या सर्वत्र वापरात आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालयाचे मा.चेअरमन श्री. बिपीनभाई पटेल, संचालक मंडळ, डॉक्टर्स व स्टाफतर्फे डॉ. शशिकांत गंजाळे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
HFN (Hip Fixation Nail) साठी डॉ. शशिकांत गंजाळे यांना पुरस्कार मिळाल्याने सोलापूर ऑर्थोपेडीक सोसायटी व तमाम सोलापूरकरांकडून कौतुक होत आहे.