Friday, May 9, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान …

MH 13 News by MH 13 News
9 September 2024
in महाराष्ट्र
0
सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान …
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान

चंद्रपूर, – आपण सनातन संस्कृतीत ऋग्वेदाचा उल्लेख करतो. या महान ग्रंथात सिंधू आणि सिंध या शब्दांचा नऊवेळा उल्लेख आहे. ही एक महान संस्कृती आहे. त्यामुळेच सिंधी संस्कृतीचा उल्लेख होतो तेव्हा पर्यायाने राष्ट्रभक्तीचाही उल्लेख होतो. या समाजाने निर्माण केलेल्या साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. या साहित्यातील संदेश, त्यातील भाव आणि आशय समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी साहित्य अकादमीची आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचा 2023-24 चा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोगरेवार, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, भारतीय सिंधू सभेचे माजी अध्यक्ष लधाराम नागवानी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे सदस्य राम जवाहरानी, पुज्य सिंधी सेवा समितीचे सुरेश हरीरामानी, लालजी पंजाबी, राजकुमार जग्यासी, ग्यानचंद टहलीयानी, सिंधी साहित्य अकादमीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘गंगेच्या किनाऱ्यावर ज्ञान प्राप्त करता येते. यमुनेच्या किनाऱ्यावर प्रेम आणि भक्तीचा संगम बघायला मिळतो आणि सिंधू नदीच्या किनाऱ्यावर मानवतेची संस्कृती बघायला मिळते. सिंधी समाज हा सभ्यतेचे प्रतिक आहे, यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आपण कोणत्याही जातीचे असलो तरीही राष्ट्रगितामध्ये ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’ असे म्हणतोच. राष्ट्रभक्तीचे धडे आपल्याला शाळेतच मिळतात. मी ज्या पक्षात आहे, तिथे तर लहानपणापासून अटलजी -अडवाणीजी यांचे नारे लावत मोठा झालो. अडवाणीजींचे देशभक्तीने ओतप्रोत शब्द मी ऐकले आहेत. माझ्यावर त्याचे संस्कार झाले आहेत,’ याचाही श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

‘या जगातील सर्वांत पहिले पोर्ट (बंदर) सिंधी समाजाच्या एका व्यक्तीने बनविले. आपण ज्या इंडस व्हॅलीबद्दल, सिंधी संस्कृतीबद्दल बोलतो त्याच संस्कृतीत अर्थव्यवस्थेतील पहिले नाणे बनवताना भगवान महादेवाच्या ओमला चिन्हित करण्याचे काम सिंधी समाजाने केले आहे,’ असेही ते म्हणाले. ‘मी पहिल्यांदा १९९५ ला विधानसभा निवडणूक जिंकलो त्या विजयात सिंधी समाजाचाही वाटा आहे. असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार

आज वितरीत होणारे पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे किंवा राज्य सरकारच्या सिंधी साहित्य अकादमीतर्फे देण्यात येत आहेत, असे भाव मनात ठेवू नका. हा पुरस्कार चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज आणि भामरागड चे रायगडपर्यंत ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या साडेतेरा कोटी महाराष्ट्रवासीयांच्या वतीने दिला जात आहे, या भावनेने स्वीकार करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

सिंधू संस्कृतीचे जगाला आकर्षण

सिंधी साहित्य अकादमीची निर्मिती यासाठी की सिंधी साहित्याचा, सिंधू संस्कृतीचा संदर्भ पाच हजार वर्षांपूर्वीपासून होत आहे. संपूर्ण जग इंडस-व्हॅलीच्या सभ्यतेवर संशोधन करत आहे. संत झुलेलाल, वरुण देव आणि जलदेवतेची पुजा करणारी ही संस्कृती आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.

चंद्रपूरचा अभिमान

माझा जिल्हा देशाच्या नकाशात उठून दिसावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. या जिल्ह्यातील सैनिक स्कूल सर्वांत उत्तम. वन अकादमीला थ्री स्टारचा दर्जा मिळाला आहे. देशात कुठेही वन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली की त्याचे प्रशिक्षण चंद्रपूरला व्हावे असा निर्णय झाला आहे. देशाची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराचे दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. संसद भवनातील दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. एवढेच नव्हे तर लंडनला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचे भाग्यही चंद्रपूरलाच लाभले आहे.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, त्यांची खुर्ची, कॅबिनेट हॉल, हे सुद्धा चंद्रपूरच्याच लाकडापासून तयार होत आहे. चंद्रपूरची मान अभिमानाने उंचावणार आहे, अशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पुरस्कारांची रक्कम दुप्पट

सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम पुढच्या वर्षीपासून दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. सिंधी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेत आहे. जोपर्यंत माझ्या हातात अधिकार आहेत मी सिंधी समाजाच्या सोबत उभा राहील, असा विश्वासही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

असे आहेत पुरस्कार

अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार – नंदलाल छुगानी (१ लक्ष रुपये)

वाङ्‍‍मय पुरस्कार-  १. डॉ. भारत खुशालाणी २. कोमल सुखवानी ३. प्रिया वछाणी ४. हासानंद सतपाल (प्रत्येकी ५० हजार रुपये) पत्रकारिता पुरस्कार – विनोद रोहाणी (२५ हजार रुपये) अनुवाद पुरस्कार – जुली तेजवानी (२५ हजार रुपये) काव्य पुरस्कार – जीवन वाधवानी (२५ हजार रुपये) नवोदित साहित्यिक पुरस्कार – सोना खत्री (२५ हजार रुपये).

Tags: सिंधी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान

चंद्रपूर – आपण सनातन संस्कृतीत ऋग्वेदाचा उल्लेख करतो. या महान ग्रंथात सिंधू आणि सिंध या शब्दांचा नऊवेळा उल्लेख आहे. ही एक महान संस्कृती आहे. त्यामुळेच सिंधी संस्कृतीचा उल्लेख होतो तेव्हा पर्यायाने राष्ट्रभक्तीचाही उल्लेख होतो. या समाजाने निर्माण केलेल्या साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. या साहित्यातील संदेश, त्यातील भाव आणि आशय समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी साहित्य अकादमीची आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचा 2023-24 चा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोगरेवार, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, भारतीय सिंधू सभेचे माजी अध्यक्ष लधाराम नागवानी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे सदस्य राम जवाहरानी, पुज्य सिंधी सेवा समितीचे सुरेश हरीरामानी, लालजी पंजाबी, राजकुमार जग्यासी, ग्यानचंद टहलीयानी, सिंधी साहित्य अकादमीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘गंगेच्या किनाऱ्यावर ज्ञान प्राप्त करता येते. यमुनेच्या किनाऱ्यावर प्रेम आणि भक्तीचा संगम बघायला मिळतो आणि सिंधू नदीच्या किनाऱ्यावर मानवतेची संस्कृती बघायला मिळते. सिंधी समाज हा सभ्यतेचे प्रतिक आहे, यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आपण कोणत्याही जातीचे असलो तरीही राष्ट्रगितामध्ये ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’ असे म्हणतोच. राष्ट्रभक्तीचे धडे आपल्याला शाळेतच मिळतात. मी ज्या पक्षात आहे, तिथे तर लहानपणापासून अटलजी -अडवाणीजी यांचे नारे लावत मोठा झालो. अडवाणीजींचे देशभक्तीने ओतप्रोत शब्द मी ऐकले आहेत. माझ्यावर त्याचे संस्कार झाले आहेत,’ याचाही श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

‘या जगातील सर्वांत पहिले पोर्ट (बंदर) सिंधी समाजाच्या एका व्यक्तीने बनविले. आपण ज्या इंडस व्हॅलीबद्दल, सिंधी संस्कृतीबद्दल बोलतो त्याच संस्कृतीत अर्थव्यवस्थेतील पहिले नाणे बनवताना भगवान महादेवाच्या ओमला चिन्हित करण्याचे काम सिंधी समाजाने केले आहे,’ असेही ते म्हणाले. ‘मी पहिल्यांदा १९९५ ला विधानसभा निवडणूक जिंकलो त्या विजयात सिंधी समाजाचाही वाटा आहे. असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार

आज वितरीत होणारे पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे किंवा राज्य सरकारच्या सिंधी साहित्य अकादमीतर्फे देण्यात येत आहेत, असे भाव मनात ठेवू नका. हा पुरस्कार चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज आणि भामरागड चे रायगडपर्यंत ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या साडेतेरा कोटी महाराष्ट्रवासीयांच्या वतीने दिला जात आहे, या भावनेने स्वीकार करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

सिंधू संस्कृतीचे जगाला आकर्षण

सिंधी साहित्य अकादमीची निर्मिती यासाठी की सिंधी साहित्याचा, सिंधू संस्कृतीचा संदर्भ पाच हजार वर्षांपूर्वीपासून होत आहे. संपूर्ण जग इंडस-व्हॅलीच्या सभ्यतेवर संशोधन करत आहे. संत झुलेलाल, वरुण देव आणि जलदेवतेची पुजा करणारी ही संस्कृती आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.

चंद्रपूरचा अभिमान

माझा जिल्हा देशाच्या नकाशात उठून दिसावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. या जिल्ह्यातील सैनिक स्कूल सर्वांत उत्तम. वन अकादमीला थ्री स्टारचा दर्जा मिळाला आहे. देशात कुठेही वन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली की त्याचे प्रशिक्षण चंद्रपूरला व्हावे असा निर्णय झाला आहे. देशाची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराचे दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. संसद भवनातील दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. एवढेच नव्हे तर लंडनला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचे भाग्यही चंद्रपूरलाच लाभले आहे.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, त्यांची खुर्ची, कॅबिनेट हॉल, हे सुद्धा चंद्रपूरच्याच लाकडापासून तयार होत आहे. चंद्रपूरची मान अभिमानाने उंचावणार आहे, अशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पुरस्कारांची रक्कम दुप्पट

सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम पुढच्या वर्षीपासून दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. सिंधी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेत आहे. जोपर्यंत माझ्या हातात अधिकार आहेत मी सिंधी समाजाच्या सोबत उभा राहील, असा विश्वासही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

असे आहेत पुरस्कार

अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार – नंदलाल छुगानी (१ लक्ष रुपये)

वाङ्‍‍मय पुरस्कार-  १. डॉ. भारत खुशालाणी २. कोमल सुखवानी ३. प्रिया वछाणी ४. हासानंद सतपाल (प्रत्येकी ५० हजार रुपये) पत्रकारिता पुरस्कार – विनोद रोहाणी (२५ हजार रुपये) अनुवाद पुरस्कार – जुली तेजवानी (२५ हजार रुपये) काव्य पुरस्कार – जीवन वाधवानी (२५ हजार रुपये) नवोदित साहित्यिक पुरस्कार – सोना खत्री (२५ हजार रुपये).

Tags: सिंधी

Previous Post

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य –

Next Post

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…

Related Posts

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी
कृषी

8 May 2025
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश
गुन्हेगारी जगात

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

8 May 2025
NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…
महाराष्ट्र

NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…

8 May 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात

8 May 2025
Next Post
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.