MH 13News Network
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सद्यस्थितीत केंद्रात आणि अनेक राज्यात भाजपा सत्तास्थानी आहे.
याच भाजपातील एका कार्यकर्त्याला थेट खासदार करण्याची मनोरंजक स्टोरी अशी आहे …
भाजपाला पार्टी विथ डिफरन्स असे मानले जाते. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उच्च पदावर विराजमान करण्याचे काम भाजपच्या वरच्या फळीने अगदी सहजपणे केले आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या मनात जोश आणि उत्साह निर्माण करण्यासाठी माजी खासदार अमर साबळे यांचे उदाहरण चपखल लागू पडते.
अमर साबळे यांना न मागता राज्यसभा खासदार कसे केले व तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या कथाकथन स्टाईल भाषेत हा अमर साबळे यांचा खासदारकीचा किस्सा ऐकणे म्हणजे अनेक भाजपा कार्यकर्त्यांसाठी परवलीच म्हणावी लागेल, असे खुद्द भाजपाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी सांगताना दिसतात..
2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाच्या पाठिंब्यावर मातब्बर भाजपा ४० नेत्यांनी राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यापैकी नावांची छाननी करून १० नावे दिल्लीस पाठविण्यात आली.
आणि आला एक कॉल..
एका बाजूला दिग्गज आणि मातब्बर नेते परंतु ,सर्व मातब्बर नेत्यांची नावे बाजूला ठेवून खासदारकीची उमेदवारी न मागणाऱ्या अमर साबळे यांना रात्री साडेअकरा वाजता पंतप्रधान मंत्री कार्यालयातून फोनवरून सांगण्यात आले. की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांनी आपले नाव राज्यसभेच्या खासदारकीसाठी महाराष्ट्रातून निश्चित केले आहे.
श्री अमर साबळे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची मॉरल स्टोरी ही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या अमर साबळे यांनी सत्तेची कुठलीही अभिलाषा न बाळगता व न मागता गेली ३० वर्ष संघटनात्मक कामात स्वतःला वाहून घेतले.
वाजत गाजत गेले परंतु…
२०१४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी भाजप प्रदेश कार्यालयातून व दिल्लीतील भाजपा केंद्रीय कार्यालयातून त्यांचे नाव घोषित झाले होते परंतु ऐनवेळी पिंपरी विधानसभा जागा भाजपा आरपीआय युतीमध्ये आरपीआयला सोडावी लागली. अर्ज दाखल करण्यासाठी वाजत गाजत गेलेले अमर साबळे कोणतीही नाराजी किंवा संतापाची प्रतिक्रिया व्यक्त न करता रिकाम्या हाती परत आले हीच खरी अमर साबळे यांची पक्षनिष्ठा..
“सर्वप्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः”
या भाजपच्या तत्त्वाशी अशीच पक्षनिष्ठा आणि बांधिलकी पाळणाऱ्याच्या मागे भाजपचे नेतृत्व खंबीरपणे उभे राहते.
असा जेव्हा किस्सा बैठकीमध्ये सांगितला जातो तेव्हा कार्यकर्ते आनंदाने टाळ्या वाजवतात आणि प्रत्येकाला असे वाटते की अमर साबळे सारखे आपलेही “अच्छे दिन आने वाले है!
निष्ठा तत्व संघटन आणि बांधिलकीला फाट्यावर मारणाऱ्यांचा राजकारणात गोंधळ माजला जात असताना माजी खासदार अमर साबळेंची तत्त्वनिष्ठता शोभून दिसणारी आहे आणि मनाला भावणारी आहे अशीच व्यक्ती देश, देव, धर्म, आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करु शकते असा विश्वास वाटतो.अशी प्रतिक्रिया भाजपच्या युवा नेत्यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.