माढा (प्रतिनिधी, शेखर म्हेत्रे) |
:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या ओबीसी सेलच्या माढा शहराध्यक्षपदी मारुती उर्फ बापू राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते माढा येथे त्यांना औपचारिकपणे नियुक्तीपत्र देण्यात आले.
बापू राऊत हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांनी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत.
पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करत, पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोचवणे आणि माढा शहरात पक्ष संघटन मजबूत करणे, हे आपले प्राथमिक उद्दिष्ट राहील, असे राऊत यांनी निवडीप्रसंगी सांगितले.

या वेळी तालुका अध्यक्ष दयानंद जाधव, दिनेश जगदाळे, दत्तात्रय राऊत, आबा साठे, रवि सरवदे, किरण पवार, सलीम पिंजारी, भारत खंडागळे, बाबासाहेब ओहळ, दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बापू राऊत यांचे पक्षाच्या विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.