Wednesday, February 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

⭕ गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृद्ध मतदारांना आनंद

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
⭕ गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृद्ध मतदारांना आनंद
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

चंद्रपूर: चार दिवसांत ११८५ मतदारांनी नोंदविले मत

चंद्रपूर, दि. १२: ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे.

‘मी पूर्णपणे दिव्यांग आहे, स्वत:च्या पायावर किंवा कशाचाही आधाराने उभी राहू शकत नाही, त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हते, आज प्रशासनाने घरी येऊन मत नोंदविले, याचा अतिशय आनंद आहे’ अशा भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या दिव्यांग महिलेने.

‘मतदानासाठी लोक घरी आले, आम्ही म्हटलं, बापू मतदानासाठी आम्हाले मतदान केंद्रावर जाता येत नाही, त्यांनी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतलं, आम्हाला आनंद झाला’, असे मत व्यक्त केले नारपठार (विजयगुडा) येथील संग्राम कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृद्ध जोडप्याने. तर खांडरे ले-आऊट, शिवछत्रपती नगर, चंद्रपूर येथील रहिवासी अनंत देविदास कावळे आजोबा म्हणाले, ‘माझे वय 90 च्या वर असून आज घरून मतदान केलं, याचा अतिशय आनंद झाला’.

होय, सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल पासून गृह मतदानाला सुरूवात झाली. आतापर्यंत चार दिवसात एकूण 1185 मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपले मत नोंदविले असून यात 1025 मतदार 85 वर्षांवरील तर 160 मतदार दिव्यांग आहेत.

तालुकानिहाय गृहमतदानाची संख्या : राजुरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले 310 मतदार आणि दिव्यांग 21 असे एकूण 331 मतदारांनी गृहमतदानातून मत नोंदविले आहे. चंद्रपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 167, दिव्यांग 15 असे एकूण 182 मतदार, बल्लारपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 186, दिव्यांग 56 असे एकूण 242 मतदार, वरोरा मतदारसंघात 85 वर्षांवरील 200, दिव्यांग 39 असे एकूण 239 मतदार, वणी मतदारसंघात 85 वर्षांवरील 89, दिव्यांग 17 असे एकूण 106 मतदार तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 73, दिव्यांग 12 असे एकूण 85 मतदारांनी गृह मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सुचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

Previous Post

⭕जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

Next Post

⭕चंद्रपूरात निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

Related Posts

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
आरोग्य

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

3 February 2026
केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
महाराष्ट्र

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

3 February 2026
केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नोकरी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 February 2026
मायेची छाया : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांवर प्रेमळ हात
महाराष्ट्र

मायेची छाया : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांवर प्रेमळ हात

3 February 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन

3 February 2026
मतदानाचा महास्फोट! ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
महाराष्ट्र

मतदानाचा महास्फोट! ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

3 February 2026
Next Post
⭕चंद्रपूरात निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

⭕चंद्रपूरात निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.