Thursday, May 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून आढावा

MH 13 News by MH 13 News
27 May 2024
in Blog
0
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून आढावा
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदी  प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक उपाययोजनेसह प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदुषणाबाबत आढावा बैठकीत पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहाआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदुषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत मा. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 2014 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती.  यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणेचे अधिकारी समितीमध्ये असतात. पंचगंगा नदीचे प्रदुषण होवू देवू नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात या प्रगतीचा दर 3 महिन्याला अहवाल सादर केला जातो. या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.

दीर्घकालीन उपाययोजनेध्ये कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याचे चालू असून कामे संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. प्रदुषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर व आरोग्याच्या तक्रारीबाबतही यावेळी आढावा घेतला.

तसेच तात्कालिक उपाययोजनेमध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदी नव्याने कोणत्याही प्रकारे प्रदुषण होणार नाही व प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी. नैसर्गिक व प्रदुषण मुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देवून होणाऱ्या प्रदुषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीनंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या.

Previous Post

माझी वसुंधरा अभियान ४.0 व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक

Next Post

समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Related Posts

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
Blog

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

28 April 2025
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!
Blog

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

7 April 2025
जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील
Blog

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

21 March 2025
‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !
Blog

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

21 March 2025
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
Blog

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

13 March 2025
विधानसभा प्रश्नोत्तरे
Blog

विधानसभा प्रश्नोत्तरे

6 March 2025
Next Post
समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.