MH 13 NEWS NETWORK
अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयाच्या वार्षिक क्रीडासप्ताहाचे उदघाटन संस्थेच्या संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी तर सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व सीनियर कॉलेज प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विदयार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व सांघिक भावना निर्माण व्हावी म्हणून या शाळेने क्रीडासप्ताहाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल कौतुक करून खेळामुळे विद्यार्थ्याचे शारिरीक, बौध्दिक व भावनिक विकास होतो असे मत व्यक्त केले.
प्रारंभी मशाल प्रज्वलित करून खेळाडुनी उत्कृष्ट संचालनाद्वारे मानवंदना दिली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्योत व मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या क्रीडासप्ताहात खो-खो, कबड्डी, क्रिकेट,लंगडी, धावणे, लांब उडी ,ऊंच उडी, गोळा फेक,थाळी फेक इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक कुमार जाधव, रंजना चव्हाण, दिगंबर जगताप, शरणबसप्पा चानकोटे, सागर मठदेवरू, पूजा कडबगावकर, रवीकिरण दंतकाळे, सिद्रामप्पा पाटील यानी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन निशिगंधा कोळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.