Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

हातभट्टीला दणका ! माढ्यात पकडली गोवा दारू..! वाचा सविस्तर

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
63
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

हातभट्टी दारू वाहतुकीला पुन्हा दणका
तीन वाहनांसह 1580 लिटर हातभट्टी दारू जप्त
माढ्यातही गोवा दारू पकडली

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात मुळेगाव तांड्यावरून सोलापूर शहर परिसरात वाहतूक होणारी 1580 लिटर हातभट्टी दारू व तीन वाहने जप्त करण्यात आली. तसेच शुक्रवारी आढेगाव (ता.माढा) येथे बहात्तर हजार रुपये किमतीची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची तीन वाहने पकडली आहे. या कारवाईदरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड, वय 34 वर्षे राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12 JH 0307 वरून सहा रबरी ट्यूब मध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करतांना पकडले.

दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय 28 वर्षे राहणार सिताराम तांडा याला बक्षीहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद- सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 21 वर्षे राहणार मुळेगाव लमाण तांडा याला निळ्या रंगाच्या ह्युंदाई कार क्रमांक MH 12 FB 9638 मधून सहा रबरी ट्यूबमध्ये सहाशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले.

या तिन्ही कारवाईत चार लाखांच्या वाहनांसह एक लाख 59 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण पाच लाख 59 हजार 700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे, वय 34 वर्षे याला होंडा एक्टिवा क्रमांक MH 05 DT 1745 मधून एका रबरी ट्यूब मधून शंभर लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे (ता. पंढरपूर) गावाचे हद्दीत सचिन धोंडीराम जाधव, वय 44 वर्षे याला मोटरसायकल MH13 CF7553 वरून तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आढेगाव ता. माढा येथील आढेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील उसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारुचा साठा जप्त केला. या कारवाईत गोवा राज्य निर्मित रियल सेवन विदेशी दारुच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची किंमत अंदाजे 72 हजार रुपये इतकी आहे जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा सुरू आहे . हातभट्टी दारूच्या वाहतुकी सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या एकूण आठ गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व अठरा हजार दोनशे लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण सात लाख चार हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील,निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम,पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार,समाधान शेळके, सुखदेव सिद, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे व सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंढे व जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 240 गुन्हे नोंदविण्यात आले असून 31वाहनांसह नव्वद लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आवाहन..
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Tags: exiceSolapur Loksabha election
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान  

Next Post

यंदा भीमजयंती मिरवणुकीत पीबी ग्रुपचा समानतेचा भव्य दिव्य देखावा

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

यंदा भीमजयंती मिरवणुकीत पीबी ग्रुपचा समानतेचा भव्य दिव्य देखावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.