Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत

पुणे  गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री श्री. सावे म्हणाले.

पुणे जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे मंडळाने नेमलेले देखरेख समितीचे सदस्य प्रमोद यादव, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. सावे म्हणाले की, म्हाडाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात अनेक सदनिका उभारण्यात आल्या आहेत. म्हाडाची सोडत संपूर्ण संगणकीय प्रणालीवर आधारीत असून यात मानवी हस्तक्षेप होत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याने नागरिकांचा या सोडतीवर विश्वास वाढला आहे. म्हाडाच्या संगणकीय सोडतीला नागरिकांचा मिळणारा प्रतिसादावरून राज्यात परवडणाऱ्या दरातील घरांची गरज आणि मागणी दिसून येत आहे. सोडतीत घर न मिळालेल्यांसाठी लवकरच म्हाडातर्फे दुसरी सोडत काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांनी प्रास्ताविकात सोडतीविषयी माहिती दिली. म्हाडा पुणेतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात येत असून यासाठी ४६ हजार ५३२ अर्ज प्राप्त झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते २० टक्के सर्वसमावेशक योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांची सोडत काढण्यात आली.

सोडतीत नाव आलेल्या नागरिकांचा जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घर मिळाल्याचे समाधान व्यक्त करताना अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोडतीचा निकाल  https://mhada.gov.in  आणि https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच पुणे मंडळाच्या कार्यालयातदेखील दर्शविण्यात आला आहे.

Previous Post

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Next Post

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा  निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
Blog

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

15 November 2025
सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
Blog

सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक

14 November 2025
शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
Blog

शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

11 November 2025
“शिवणी” अन्यत्र  स्थलांतर करण्याची  माजी आमदार दिलीप माने यांची मागणी..! हे आहे कारण..
Blog

“शिवणी” अन्यत्र स्थलांतर करण्याची माजी आमदार दिलीप माने यांची मागणी..! हे आहे कारण..

30 October 2025
वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे
Blog

Vaibhav waghe Murder Case | समरसेनजीत गायकवाडसह चौघांच्या जामीनवर..Update

16 October 2025
Next Post
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा  निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा  निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.