Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त रविवारी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे ” औषधाविना आरोग्य ” विषयावर व्याख्यान !

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त रविवारी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे ” औषधाविना आरोग्य ” विषयावर व्याख्यान !
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दमानी नगर येथील ह.भ.प.आप्पाराव सवाळकर उद्यानात राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे ” औषधाविना आरोग्य ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गवळी वस्ती तालीम संघाचे आधारस्तंभ महादेव गवळी आणि उत्सव अध्यक्ष विष्णू जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


गवळी वस्ती तालीम संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्याचे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा यामागे उद्देश आहे. व्याख्यानासोबतच वर्षभर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबविण्यात येतात. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. निसर्गोपचार तज्ञ आणि व्याख्याते स्वागत तोडकर यांचे ” औषधाविना आरोग्य ” या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्वागत तोडकर हे निसर्गोपचार तज्ञ असून मनुष्याच्या शारीरिक सर्व व्याधींवर ते घरगुती उपचार सांगतात. शुगर, बीपी, थायरॉईड, गुडघेदुखी, कंबरदुखी, कानाच्या समस्या, केस गळती ,पित्त ,काळे डाग, मणक्याचे विकार, हृदय विकार ,फ्रोजन शोल्डर, मुळव्याध ,डोळ्याचे आजार, कॅन्सर यासह संधिवात आदी आजारांवर औषधे खाण्यापेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय करूनच आजाराला बाय-बाय करण्याचा सल्ला स्वागत तोडकर देतात. हसत खेळत रहा ,आनंदी रहा, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटा असा सल्ला देतानाच शहाण्या माणसाने कोर्ट आणि दवाखान्याची पायरी चढू नये असे ते निक्षूण सांगतात. निरोगी जीवन जगण्यासाठीची प्रेरणा देणाऱ्या स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानासाठी हजारो नागरिकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर निरोगी आरोग्याचा सल्ला देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदाच्या तिसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दमानी नगरातील ह. भ. प . आप्पाराव सवाळकर उद्यानात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला हेमंत पिंगळे, शामराव गांगर्डे,शेखर कवठेकर,लहू गायकवाड, बालाजी चराटे, चंद्रकांत पवार,अरविंद गवळी,सुनील कदम, भैय्या जगताप, संदीप काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

जुने दत्त मंदिरात गुरूवारपासून गुरुप्रतीपदा महोत्सव; रविवारी पालखी प्रदक्षिणा

Next Post

प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागृत असावे

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागृत असावे

प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागृत असावे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.