Thursday, October 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसाठी विनामूल्य जमिनी

मुंबई, दि. ३: गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटी व शर्थींच्या अधीन राहून पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सर्वश्री रामराजे नाईक-निंबाळकर, दत्तात्रय भरणे, दीपक चव्हाण, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (ई-उपस्थिती), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील (ई-उपस्थिती), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, शेती महामंडळाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील कळंब, वालचंदनगर, लासुर्णे, अंथुर्णे, भरणेवाडी, जंकशन आनंदनगर, निमसाखर गावांसह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी राज्य शेती महामंडळाच्या जमिनी आहेत. या जमिनी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आहेत, अशा ग्रामपंचायतीकडून गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनांच्या कामासाठी जमीन मागणीचे प्रस्ताव वारंवार प्राप्त होतात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे मार्यादित उत्पन्न लक्षात घेता त्यांना सार्वजनिक कामांसाठी जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय दि. 13 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. या निर्णयानुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक कामांसाठी जमिनींची आवश्यकता आहे, त्यांनी तातडीने विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. त्यावर संबंधित यंत्रणेने तात्काळ निर्णय घ्यावेत. तसेच पाणी पुरवठा योजनेची निकड लक्षात घेता काही अटी व शर्थींच्या अधिन राहून पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्याची परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योंजनांकरिता महामंडळाची जमीन उपलब्ध करु देण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

ग्रामपंचायतींना गावठाण विस्तार अंतर्गत ग्राम सचिवालय, जलजीवन मिशन अंतर्गत पेय जल योजना, केंद्र व राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त घरकुल योजना, सौरऊर्जा पॅनल, घनकचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, क्रीडांगण, रस्ते आदी सार्वजनिक उपक्रमांसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

Next Post

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा – कृषी विभागाचे आवाहन

Related Posts

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…
आरोग्य

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…

13 October 2026
नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
Next Post
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा – कृषी विभागाचे आवाहन

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा – कृषी विभागाचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.