MH 13 News Network
मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीत माढा तालुक्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार
सकल मराठा समाजाची कुर्डूवाडीत बैठक

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सोलापूरात येत्या ७ ऑगस्टला शांतता रॅली निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या रॅलीसाठी माढा तालुक्यातून लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्ताने सकल मराठा समाज माढा तालुक्याची नियोजन आढावा बैठक कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयात पार पडली.

यावेळी तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख, शिवाजीराव चापले,संजय जाधव,जी.के.देशमुख, सुर्यकांत पाटील,जीवन यादव,सदाशिव पवार, धनंजय साकळकर, ॲड.श्रीरंग लाळे, महेश पवार, सचिन गुंड, सचिन तिकटे, चंद्रकांत पाथरे, सोमनाथ पवार उपस्थित होते.
यावेळी सोलापूरातील संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाबाबतची माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली व महाराष्ट्रातील सर्वात मोठी शांतता रॅली सोलापूरात होईल यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.
बैठकीचे प्रास्ताविक सचिन जगताप यांनी केले. सूत्रसंचालन निलेश देशमुख यांनी केले. यावेळी दिनेश जगदाळे, बंडूनाना ढवळे, दत्ताजी शिंदे,अॅड.विजयकुमार आडकर,संजय पाटील घाटणेकर,सौदागर जाधव,दिपक कदम, गोरख ताकभाते,किरण चव्हाण,शंकर नागणे, वाहिदभाई शेख यांनी आपल्या मनोगतातून माढा तालुक्यातून लाखो मराठा बांधव शांतता रॅलीला आणू असे सांगितले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी तात्यासाहेब पाटिल, सुरेश बागल, विजयकुमार परबत, सुहास टोणपे,प्रमोद बागल,सतिश महिंगडे,अरूण जगताप, मच्छिंद्र कदम,सचिन महिंगडे, क्षितिज टोणपे, शहाजी पाटील,अर्जुन कदम,भिमराव जाधव, अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
माढा तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :- टोणपे
संघर्षयोध्या मनोज जरांगे-पाटील यांच्या ७ ऑगस्टच्या सोलापुर येथील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी माढा तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा समाजाची एकी दाखवून द्यावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय (दादा) टोणपे यांनी केले आहे.