Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सर्व शाळांमध्ये ३० सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in शैक्षणिक
3
सर्व शाळांमध्ये ३० सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

सांगली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावेत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, अविनाश गुरव, रावसाहेब पाटील यांच्यासह समिती सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शाळेतील सर्व कर्मचारी, शिक्षकांचे पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक असून सर्वांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी विविध माध्यमातून प्राप्त निधी विचारात घेवून उर्वरित आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त करून घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करावा. 100 टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याची दक्षता घ्यावी. शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वचक निर्माण करावा. दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समितीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत आर्थिक हातभार लावून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, शिक्षक व कर्मचारी संघटना यांच्याकडूनही यासाठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्राप्त अर्ज व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व प्राप्त अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ज्यांच्या अर्जांना मान्यता दिली आहे पण अद्याप संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांच्याबाबत मंत्रालयीन स्तरावर संबंधित विभागाकडे जिल्ह्याच्या डेटाबाबत मागणी करून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संदीप यादव यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना म्हणाले, नारी शक्ती दूत ॲपवर 4 लाख 59 हजार 725 अर्ज प्राप्त झाले होते, यामधील 4 लाख 52 हजार 727 अर्ज मंजुर करण्यात आले होते, 1 हजार 251 अर्ज रिजेक्ट तर 4 हजार 657 अर्ज अंशत: रिजेक्ट करण्यात आले होते. तर नव्याने निर्माण केलेल्या पोर्टलवर 2 लाख 62 हजार 911 प्राप्त अर्जापैकी 2 लाख 43 हजार 186 अर्जांना मान्यता देण्यात आली आहे, 10 हजार 416 अर्ज तात्पुरत्या स्वरूपात मंजूर केले असून 4 हजार 991 अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट केले आहेत. कार्यवाहीमध्ये 3 हजार 758 असून 560 अर्ज रिजेक्ट केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरसांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन 

Related Posts

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”
महाराष्ट्र

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”

6 February 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.