महेश हणमे/ MH 13news
संपूर्ण राज्यात गाजलेल्या मराठा आरक्षण लढ्याला सर्वात मोठे यश मिळाले असून मनोज जरांगेच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांचा लढा हा यशस्वी झाला असून हा सातबारा हाय मराठ्यांचा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यात येणार असून मुख्यमंत्री शिंदे हे वाशी कडे रवाना झाले आहेत.
मराठ्यांची दिवाळी सुरू झाली असून सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी मान्य झाल्याने मराठ्यांच्या लढायला मोठ्या प्रमाणावर यश आला आहे. हे सर्व श्रेय मराठ्यांचे असून मिळवून दाखवलं असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश घेण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. काल मध्यरात्री मंत्री केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे भेट घेतली आणि त्यांना हे राजपत्र देण्यात आलं .तेव्हा रात्री उशिरा जरांगे पाटील यांनी जमलेल्या असंख्य समाज बांधवांसमोर लढ्याला यश आल्याचे सांगितलं आणि आज सकाळी जल्लोष करण्याचे जाहीर केले होते.
संपूर्ण राज्यातील मराठा समाजामध्ये यामुळे आनंद निर्माण झालेला आहे. आज विजय गुलाल उधळला जाणार आहे अंतरावली सराटी मोठी विजयी सभा घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आंदोलकावरील सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.