सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली सत्र सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झालेली आहे.
या बदल्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाली असून त्यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. राजेंद्र माने यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
त्यांच्या जागेवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती मिळाली आहे.