MH 13News Network
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले असून गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. आज १० ऑगस्ट रोजी त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून विजय कदम यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
कर्करोगाशी झुंज अपयशी..
अभिनेते विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत.
अभिनेता विजय कदम यांच्याविषयी..
विजय कदम यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या होत्या. आनंदी आनंद (१९८७), तेरे मेरे सपने (१९९६), देखणी बायको नाम्याची (२००१), रेवती (२००५), टोपी घाला रे (२०१०), ब्लफमास्टर (२०१२), भेट तुझी माझी (२०१३) आणि मंकी बात (२०१८) अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
चित्रपटांसोबतच विजय कदम यांनी काही नाटके आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी टूरटूर, पप्पा सांगा कोणाचे, इच्छा माझी पुरी करा आणि सही दे सही या मालिकांमध्ये ते दिसले होते.