MH 13 News Network
सोलापूर, दि. :- मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. काल सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या ‘शांतता यात्रे’ दरम्यान वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिले.
महासभेने पाठिंबा पत्रात म्हटल्याप्रमाणे, राज्यातील सर्व मराठा समाजासाठी उभारलेला संघर्ष लढा पूर्ण यशस्वी होण्यासाठी हा पाठिंबा जाहीर केला आहे. गरजू, वंचित मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावे आणि या समाजातील मागासलेल्या वर्गाचे भले व्हावे यासाठी हा पाठिंबा देण्यात येत आहे.
शांतता यात्रेदरम्यान जरांगे पाटीलांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर करणाऱ्या शिष्टमंडळात सुदीप चाकोते यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ रसाळे, शिवसेनेचे नेते दिलीप भाऊ कोल्हे, स्वप्नील चाकोते, बबन चाकोते, राजशेखर बरकुले, गणेश चिंचोळे, मल्लिनाथ सोलापुरे, नूरअहमद नालवार, मल्लिनाथ कलशेट्टी, श्रीकांत दासरी, बसवराज हिमगिरी, कल्याणराव चौधरी, नागेश शहापुरे, काशिनाथ कल्याणी, अक्षय बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.