सोलापूर : येथील दक्षिण कसबा, कुरेशी गल्लीतीलरहिवासी मुदस्सर कादिर कुरेशी (वय-३१ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय. विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांच्याकडे आला होता. त्यांनी त्यावर कार्यवाही करून मुदस्सर कुरेशी याच्या तडीपारीचा आदेश जारी केला. त्यास तडीपारीनंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुदस्सर कुरेशी याच्याविरुध्द सन २०१३ ते २०२४ या कालावधीमध्ये, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.