Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्नांसह शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फोरमच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नाफी रिसर्च सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुझेलिया इमाऐव्हा, रशियन फेडरेशन नॉर्दन अफेअर्स उपाध्यक्ष गॅलीनो कैरेलोव्हा, नवाह एनजी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक हिंद अल नक्बी, व्ही. के. कंपनीच्या उपाध्यक्ष ऐलोना इसागुलोव्हा, सीबूरच्या व्यवस्थापकीय संचालक मरीना मेडव्हेडेव्हा, अणु उद्योग महिला संघटना संस्थापक अॅलेक्झाड्रोया बिक, व्हेल फार्मच्या अध्यक्ष ल्यूड मिला शेरबाकोव्हा, केंद्रीय आरोग्य व जैविक यंत्रणा रशिया तात्याना याकोलेव्हा आणि गेम्स ऑफ द फ्यूचर्सच्या उपसंचालक ॲना खारमास यांनी “बहू केंद्रीय जागतिक अर्थ व्यवस्थेकडे संक्रमण अंतर्गत विकास धोरणाचा स्त्रियांचा आर्थिक सक्षमीकरणावरील परिणाम” या विषयावरील जागतिक परिसंवादात सहभाग नोंदविला

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांच्या आर्थिक उन्नतीसाठी व दारिद्रयनिर्मूलनासाठी जागतिकीकरणाचा प्रभाव मोठा आहे. महिलांना संधी उपलब्धता मिळण्यासाठी व त्यांचे ध्येय पूर्तता होण्यासाठो वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम व कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन यांची भूमिका महत्त्वाची आहे.

कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमनने तयार करुन दिलेल्या कृती आराखड्यावर जगभरातील सर्व राष्ट्रांना आपले उत्तर सादर करावे लागते. त्यामुळे यास अत्यंत महत्त्व आहे. स्त्रियांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे त्यांचे सक्षमीकरण होण्यास अधिक मदत मिळते.

शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांचा वाढता सहभाग असणे महत्त्वाचे आहे, लिंग समभाव व आर्थिक सक्षमीकरण यास प्रोत्साहन देणे, मानवी तस्करी, लैंगिक छळ यास प्रतिबंध करणे व बाल हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे. या बाबतीत रशियामध्ये चांगले प्रयत्न झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा आणि सेंट पीटर्सबर्ग येथील विधिमंडळ यांच्यात झालेला सामंजस्य करार या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

भारतात स्टार्ट अप उद्योगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच हस्त कला व कृषी क्षेत्रातही प्रगती होत आहे. याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान सर्वात जास्त स्त्रियांना सहन करावे लागते, ही वस्तूस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

Previous Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.