Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in मनोरंजन
0
दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

: नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय ‘कलगीतुरा’ या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे.

‘कलगीतुरा’ हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीच्या नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजन, विमल ननावरे, निलेश सूर्यवंशी, अर्णव इंगळे, आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत.

नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून, रोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या माध्यमातून पारंपरिक ‘कलगी’ आणि ‘तुरा’ या लोकपरंपरेचा संघर्ष रंगमंचावर सादर होतो, जो अंधारात हरवलेल्या लोककलेचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

‘कलगीतुरा’विषयी…

‘कलगीतुरा’ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध लोककला परंपरा आहे. यामध्ये पारंपरिक लावण्यांचा प्रयोग केला जातो, ज्यामध्ये गावातील शेतकरी आणि लोक आपल्या गाण्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी करतात. ‘कलगीतुरा’ विशेषतः अत्यंत सुरस व मजेशीर असतो, ज्यामध्ये जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून सामोरे जाता येते.

एनसीपीए मुंबईच्या ‘दपर्ण’ लेखन उपक्रमात विजेते ठरलेले हे नाटक आधीच मुंबई रंगभूमीवर खूप लोकप्रिय झाले आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे आणि लेखक दत्ता पाटील यांची जोडी मराठी रंगभूमीवर यापूर्वीही अनेक गाजलेली नाटके सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.

Previous Post

चंद्रपूर जिल्ह्यातील मनरेगातंर्गत कामगारांची प्रलंबित मजुरी तात्काळ द्या

Next Post

बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा होणार सर्वांगीण विकास

Related Posts

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
आरोग्य

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

3 February 2026
केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नोकरी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 February 2026
भविष्यासाठी हिरवा वारसा! ३०० कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार – मुख्यमंत्री फडणवीस
कृषी

भविष्यासाठी हिरवा वारसा! ३०० कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार – मुख्यमंत्री फडणवीस

3 February 2026
संस्कृती अशी की मन खुशाल; मराठी मेजवानीने दिला सुखद धक्का!” – भरत जाधव
मनोरंजन

संस्कृती अशी की मन खुशाल; मराठी मेजवानीने दिला सुखद धक्का!” – भरत जाधव

10 January 2026
“१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका वितरणाचा उपक्रम”
मनोरंजन

“१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका वितरणाचा उपक्रम”

9 January 2026
दिल्लीकरांना मराठी सणाची मेजवानी; भरत जाधवांसोबत हुरडा पार्टी व संक्रांत महोत्सव
मनोरंजन

दिल्लीकरांना मराठी सणाची मेजवानी; भरत जाधवांसोबत हुरडा पार्टी व संक्रांत महोत्सव

8 January 2026
Next Post
बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा होणार सर्वांगीण विकास

बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा होणार सर्वांगीण विकास

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.