Monday, October 13, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur | शहरातील उड्डाणपूलासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर ; जया’भाऊ’, सचिन’दादा’, देवेंद्र ‘दादा’ यांना यश

MH13 News by MH13 News
6 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur | शहरातील उड्डाणपूलासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर ; जया’भाऊ’, सचिन’दादा’, देवेंद्र ‘दादा’ यांना यश
0
SHARES
538
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती :

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

२०१५ साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत. उड्डाणपूल मंजुर होऊन ९ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता.

नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती.

तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपूलाबाबत लक्षवेधीही मांडली होती. ९०% भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते कधी सुरू होणार ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरिता शासनस्तरावरून प्रयत्न होतील, असे सांगितले होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाणपूलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपये दिले आहेत. आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे.

मेअखेर निघणार निविदा

उड्डाणपुलासाठी उर्वरित भूसंपादन पूर्ण करुन मेअखेर सुधारित उड्डाणपूलासाठीची निविदा निघणार आहे, असे दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेला कळवले आहे.

६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्पसोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपूलाला ६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असणार आहेत. तसेच दोन सर्व्हिस रस्तेही असणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासह सोलापूरकरांना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असे म्हणत विकासाचे अभिवचन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळत उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार मानावे तितके कमी आहेत. याकामी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला. यासर्वांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आभार.—

देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Narendra Modi Sachin Kalyanshetti i Nitin Gadkari CMOMaharashtra Kothe Devendra Rajesh

Tags: Ajit pawar ncpBJP MaharashtraDevendra fadanvisDevendra kothe BJPnitin gadkariSachin kalyanshettisolapurSolapur MaharashtraUdya samant
Previous Post

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर

Next Post

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

ब्लॅक मंडे | शेअर बाजार 'धडाम' कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.