mh 13 news network
सोलापूर / प्रतिनिधी :

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवारांनी होम-टू-होम प्रचार आणि पदयात्रेद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या प्रचाराला मतदारांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

न्यू बुधवार पेठ परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार कविताताई चंदनशिवे, सुशील बंदपट्टे, सारिकाताई फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांनी घराघरांत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज तसेच इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत आपल्या अडचणी उमेदवारांसमोर मांडल्या.

श्रीराम नगर परिसरात झालेल्या होम-टू-होम प्रचारादरम्यान महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिला भगिनींनी उमेदवारांचे स्वागत करत परिसरातील दैनंदिन समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.

या पदयात्रा आणि होम-टू-होम प्रचारामुळे प्रभाग ४ मधील निवडणूक लढतीला अधिक रंगत आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे उमेदवार कविताताई चंदनशिवे, सुशील बंदपट्टे, सारिकाताई फुटाणे व विश्वनाथ बिडवे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आ








