Thursday, July 30, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
40
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टचा उपक्रम : दररोजच्या कुंकूमार्चनात महिला भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll असा मंत्रघोष करीत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास सोमवारी विमानतळापाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.



सोमवारी सकाळी गोपूजन, ध्वजपूजन, मंगलमंत्र पठण, महागणपती पूजन, स्वस्तिपुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विग् वरण, प्रधान देवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंड संस्कार, नवग्रह होमम् हे विधी करण्यात आले. यानंतर अतिरुद्र स्वाहाकारास आरंभ झाला.

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्यासह मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया, यजमान माजी महापौर किशोर देशपांडे, स्वागत समिती उपाध्यक्ष सोमनाथ वैद्य, मठाचे विश्वस्त उद्योजक सतीश कुलकर्णी, सुधीर इनामदार यांनी सहकुटुंब अतिरुद्र स्वाहाकार केला.



भगवान श्री शंकर आणि श्री पार्वती देवीची मांडलेली पूजा, रुद्राची एकामागून एक होणारी आवर्तने, महिला भाविकांच्या हस्ते कुंकुमार्चन आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. सायंकाळी शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, महामंगलारती करण्यात आली.

मंगळवारपासून रविवारपर्यंत दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अतिरुद्र स्वाहाकार, सकाळी १० ते १२ कुंकूमार्चन तर दुपारी १२ वाजता दररोज भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी दररोज या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनी याप्रसंगी केले.
————–


पिंपळ अन् शमीच्या लाकडापासून प्रज्वलित केला अग्नी ..!

अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त अग्निमंथन विधीद्वारे अग्निप्रज्वलित करण्यात आला. यावेळी अग्नी तयार करण्यासाठी काडेपेटीचा वापर न करता वेदकाळापासून चालत आलेल्या
पिंपळ आणि शमीच्या लाकडापासून घुसळून अग्नी तयार करण्याच्या पद्धतीनुसार अग्नी प्रज्वलित करण्यात आला. हा विधी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Tags: solapurअतिरुद्र
Previous Post

Matrushakti: स्त्री शक्तीचे जागरण केल्यास समाज परिवर्तन निश्चित  -अलका इनामदार

Next Post

श्री रूपाभवानी मातेच्या भाविकांसाठी सुखद वार्ता ; आमदार देशमुखांच्या प्रयत्नांना यश

Related Posts

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
सोलापूर शहर

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

28 July 2026
तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात
मनोरंजन

तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात

28 July 2026
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
Next Post

श्री रूपाभवानी मातेच्या भाविकांसाठी सुखद वार्ता ; आमदार देशमुखांच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.