Friday, June 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित

MH 13 News by MH 13 News
18 September 2024
in Blog
0
माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून पुष्पवृष्टी

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप

मुंबई – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. बळीराजावरील अरिष्ट टळू दे, राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे अशी प्रार्थना गणरायाला केली आहे. जनतेला सुखी करण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जनतेचे कल्याण हेच शासनाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

देश विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवअंतर्गत उभारलेल्या विशेष गणेश दर्शन गॅलरीसही  राज्यपाल श्री. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन गणेशाची आरती केली.

त्याचप्रमाणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस नियंत्रण कक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मंडपालाही भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी राज्यपाल श्री. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासोबतच इथे जमलेल्या श्री साधकांशी संवाद साधला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून त्यात 10 हजार श्रीसाधक सहभागी झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी या श्री साधकांसोबत आणि इतर नागरिकांसोबत मनसोक्त सेल्फी घेतले.

Previous Post

राज्यपालांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे घेतले दर्शन

Next Post

नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

Related Posts

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
Blog

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

28 April 2025
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!
Blog

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

7 April 2025
जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील
Blog

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

21 March 2025
‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !
Blog

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

21 March 2025
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
Blog

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

13 March 2025
विधानसभा प्रश्नोत्तरे
Blog

विधानसभा प्रश्नोत्तरे

6 March 2025
Next Post
नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.