MH 13 News Network
अनंत जाधव यांना मध्यची उमेदवारी का मिळावी.? भाजप कार्यकर्त्यांनी केला खुलासा, नेता का म्हणतात..? सविस्तर वाचा..
सोलापूर : प्रतिनिधी -भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते अनंत ज्ञानेश्वर जाधव यांचा राजकीय जीवन प्रवास हा भाजपमधून सुरू झाला आणि भाजपमध्ये अविरत सुरू आहे. 1997 ते 2002 या काळात भारतीय जनता पक्षाचे वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. या काळात त्यांनी सोलापूर शहरातील जनतेशी संपर्क सुरू केला यानंतर 2002 ते 2003 या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रभाग अध्यक्ष म्हणून त्यांना कार्यकर्त्याची संधी मिळाली. यावेळेस त्यांना नेता म्हणून सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार हाक मारू लागले. सर्व सामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख शहरात निर्माण झाली.
2003 ते 2004 या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या कामाची दखल घेत त्यांची भारत टेलिफोन निगम दूरसंचार सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्त करण्यात आली ही समिती भारत सरकारची असून त्यावर देखील त्यांनी उत्कृष्ट काम केले. 2004 ते 2006 काळात भारतीय जनता युवा मोर्चा शहर उत्तर मंडल चिटणीस पदी निवड झाली या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना भाजपमध्ये घेत भाजपची युवाशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य केले.
याच बरोबर पक्ष बांधणीसाठी त्यांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत अनेकांना त्यात सहभागी करून घेतले तर नंतर 2006 ते 2007 मध्ये युवा मोर्चा संघटक शहर चिटणीस म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली यादरम्यान त्यांनी या संधीचे सोनं करत शहरातील युवकांना भाजपमध्ये घेत संघटन मोठ्या प्रमाणात तयार केले.
युवकांना घेऊन अनेक लक्षवेधी आंदोलन केली सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारा नेता म्हणून त्यांना आनंद नेता जाधव असे देखील म्हटले जाते. 2007 मध्ये पक्षाकडून महापालिकेची उमेदवारी जाहीर झाली परंतु अवघ्या 36 मताने त्यांचा पराभव झाला हा पराभव नसून येणाऱ्या काळातील विजयाची नांदीच होती कारण की 2012 मध्ये महापालिकेत त्यांनी अधिक मताधिक्याने निवडून येत एक विक्रम केला.जनतेशी असलेली नाळ सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ यामुळे त्यांनी प्रभागातील नव्हे तर शहरातील अनेकांची मने जिंकली.
नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची स्थायी समिती सदस्य मधून नियुक्ती केली यावेळी सर्वांना समान निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला 2019 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनादेश यात्रेची सोलापूर शहरातील सजावटीची जबाबदारी अनंत जाधव यांच्यावर होती.
यावेळी त्यांनी महा जनादेश यात्रेसाठी येणाऱ्या महिलांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली. यासह उत्कृष्ट नियोजन केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील त्यांचे कौतुक केले. 2009 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सरदार अमित भाई शहा या नावाने उल्लेख करणारे अनंत जाधव हे होते आणि त्या उल्लेखाचे बॅनर संपूर्ण शहरांमध्ये लावण्यात आले होते.
त्यावेळी त्यांच्या या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.2022 ते 2024 सोलापूर भाजप शहर उपाध्यक्ष मधून नियुक्ती झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यां बरोबर कार्य करण्याची संधी मिळाली यावेळी त्यांनी त्या संधीचे सोने करत आपल्या कामाची चुणूक दाखवली.
यासह ज्यावेळी भाजपची सत्ता नसायची त्यावेळी जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी विविध मार्गाने आंदोलन देखील केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या प्रभागासह शहरातील अनेक मराठा युवकांना उद्योग व्यवसायासाठी लोन मंजूर करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सोलापूर शहर मध्य ची उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते आणि अनंत जाधव मित्र परिवाराच्या वतीने पक्षाकडे केली आहे.