Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; वर्षभरात 2067 गुन्ह्यात 6 कोटींचा मुद्देमाल जप्त

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, सोलापूर शहर
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; वर्षभरात 2067 गुन्ह्यात 6 कोटींचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
151
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष 2023-24 करिता शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, 31 मार्च अखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा महसूल शासनजमा झाला असून 114% उद्दिष्ट पूर्तता केली आहे. वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली आहे. या कालावधीत विभागाने 66,822 लिटर हातभट्टी दारू, 2971 लिटर देशी दारू, 1043 लिटर विदेशी दारू, 2970 लिटर परराज्यातील दारू, 533 लिटर बियर, 12456 लिटर ताडी व 12 लाख 7 हजार 749 लिटर गुळमिश्रित रसायन व 215 वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबविली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारु विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत.हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुकानिहाय व पोलीस स्टेशन निहाय हातभट्टी दारु ठिकाणांची मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच गावातील सरपंच , पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असतल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 33 लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण एकोणविस हजार दोनशे लिटर रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक , एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक, तीन जवान व एक वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून याव्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्रकृतिदल असे विशेष पथक नेमण्यात आले आहे.

याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी व मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी दोन तात्पुरते सीमा तपासणी स्थापन करण्यात आले असून संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त दारु दुकानातून होणा-या दररोजच्या दारु विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारु दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचेही अधीक्षक नितिन धार्मिक यांनी सांगितले.

आवाहन..सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

बार्शी | “या” वाईन शॉपचा परवाना निलंबित…

Next Post

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.